शीतल टाईम्स // घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न "युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम" – महिला हक्क आणि संघटनात्मक एकजुटीवर भर
शीतल टाइम्स प्रतिनिधी
शीतल टाईम्स प्रतिनिधी | श्रीरामपूर
घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न
"युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम" – महिला हक्क आणि संघटनात्मक एकजुटीवर भर
श्रीरामपूर – युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे "घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा" मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना हनीफ शेख म्हणाले, "घरकामगार महिला असंघटित क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता व वेतन यासारख्या मूलभूत बाबींसाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो. युवाग्राम संस्था या महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोलाचे कार्य करत आहे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार यांनी "ज्यांचे प्रश्न... त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज" या संकल्पनेवर भर देत घरकामगार महिलांच्या हक्कासाठी संघटनात्मक बांधणीचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमात फिरोज शेख, अमोल सोनवणे, शायिस्ता शेख, अनिता शेलार, आदित्य पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "घरकामगार महिला कोणाचे उपकार घेत नाहीत, तर त्या श्रमिक आहेत. त्यांचा आदर करणे ही समाजाची व शासनाची जबाबदारी आहे." त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर देत महिलांना प्रशिक्षणाद्वारे प्रगतीचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले. शायिस्ता शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर अनिता शेलार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यशाळेला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या उपक्रमातून महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे व आयोजक.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा