शीतल टाईम्स // महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
📍 खंडाळा | शीतल टाईम्स प्रतिनिधी
महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर खंडाळा येथे उत्साहात संपन्न; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे आयोजित शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शिबिराचे उद्घाटन शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
शिबिरात मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी सांगितले की, "गावपातळीवरील नागरिकांपर्यंत प्रशासनाने पोहोचून त्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत हा या शिबिराचा उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान बनते."
शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, तसेच सात-बारा व फेरफार नोंदी, रेशन कार्ड वितरण, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, अॅग्रिस्टॅक नोंदणी, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना देण्यात आला. याशिवाय महिला बचत गटांनी स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून सहभाग नोंदवला.
---
🧾 तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे आवाहन
“महसूल प्रशासन गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यातही अशाच शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीही दाखले वाटप शिबिर घेतले जातील,” असे वाघ यांनी सांगितले.
---
📌 शिबिरात सहभागी अधिकारी व मान्यवर
तहसीलदार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी, दत्तात्रय शेकटकर, गटविकास अधिकारी म्हस्के, पुरवठा अधिकारी आर. बी. शिंदे, मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ, सरपंच छायाताई बर्डे, उपसरपंच भारती वाघमारे, सदस्य मंजुषा ढोकचौळे, माजी सरपंच भास्कर ढोकचौळे, सरपंच सारिका कुंकुलोळ, तलाठी, महसूल सहाय्यक, कृषी व पंचायत समिती अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
---
🗣️ छायाताई बर्डे (सरपंच, खंडाळा) यांचे प्रतिपादन
“या शिबिरामुळे महसूल प्रशासन गावाच्या जवळ आले. नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण होणे हीच या शिबिराची यशस्वी फलश्रुती आहे.”
"खंडाळा येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करताना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर. उपस्थित तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व शीबिरार्थी
*********************************
*********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*********************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा