शीतल टाईम्स // पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेले व्यापारी रामप्रसाद चांडक अखेर नाशिकमध्ये सापडले; धार्मिक पर्यटनानंतर साडूकडे पोहोचले



शीतल टाइम्स प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेले व्यापारी रामप्रसाद चांडक अखेर नाशिकमध्ये सापडले; धार्मिक पर्यटनानंतर साडूकडे पोहोचले


श्रीरामपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेले बेलापूर येथील व्यापारी रामप्रसाद चांडक अखेर नाशिकमध्ये सापडले आहेत. धार्मिक पर्यटन करून चांडक नाशिक येथे त्यांचे साडू श्री. सुनील करवा यांचेकडे पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

रामप्रसाद चांडक हे बेलापूर येथे आपल्या मुलासोबत मोटारसायकलवर आले होते. मुख्य झेंडा चौकात उतरल्यावर ते अचानक बेपत्ता झाले. दोन दिवस शोध घेतल्यानंतर देखील काहीच सुगावा न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर व्यापारी व ग्रामस्थांनी पोलिसांना शोधकार्यात गती देण्याची मागणी केली होती. मात्र आठवडाभराच्या अथक प्रयत्नांनंतर देखील चांडक यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रामप्रसाद चांडक हे धार्मिक स्थळांना भेट देत अखेरीस नाशिकमधील आपले साडू श्री. सुनील करवा यांच्याकडे पोहोचले. श्री. करवा यांनी ही माहिती किशोर चांडक यांना कळविली.

सदर माहिती मिळताच किशोर चांडक व औरंगाबाद येथील मेहुणे नाशिककडे रवाना झाले. त्यांनी याबाबत पोलिसांना देखील माहिती दिली आहे. चांडक कुटुंबीयांनी मोठ्या धास्तीत परंतु धीराने सुरू केलेल्या शोधमोहीमेला अखेर यश आले असून त्यांच्या नातेवाईकांनी दिलासा व्यक्त केला आहे.


********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव