शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


 

गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव

बेलापूर (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गोवंशीय जनावरांची वाहतूक केली, या संशयावरून काही गोरक्षकांनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उक्कलगाव येथील धनवाट रोड परिसरात २५ ते ३० जणांचा जमाव जमा झाला होता. या जमावाने गावातीलच एका शेतकरी तरुणाला थांबवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काही काळ गावात मोठी गर्दी जमली होती. मारहाणीनंतर गावात तणाव निर्माण झाला.

गावात अफवा पसरल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मोठा जमाव जमला. मारहाण करणारे तरुण मात्र रात्रीच पसार झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी लागू झाल्यानंतर गोरक्षकांच्या नावाखाली अनेक वेळा अशा प्रकारच्या मारहाणीच्या व लुटमारीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येते. तथाकथित गोरक्षक व पोलिसांमध्ये संगनमत असल्याच्या चर्चा होत असून त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही, अशी शेतकऱ्यांत भावना व्यक्त केली जात आहे.

गोवंशीय व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार संशयाच्या भोवऱ्यात ओढले जात असल्याने “भाकड जनावरांचे काय करायचे?”, “गोरक्षकांच्या मारहाणीपासून जीव वाचवायचा तरी कसा?” असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. गावात बाहेरील लोकांचा हस्तक्षेप वाढत असल्याने परिस्थिती धोकादायक व चिंताजनक असल्याचे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.


********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार