शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी



तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित

मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी 

दोन दिवसांत तोडगा निघणार


श्रीरामपूर (प्रतिनिधी)

स्वस्त धान्य दुकानांच्या ई-पॉज मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मराठीत नावे फीडिंग केलेल्या रेशनकार्ड धारकांचे बिल तयार होत नसल्याची समस्या उद्भवली आहे. परिणामी हजारो गोरगरीब कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील धान्य वाटपापासून वंचित राहण्याची वेळ आली असून नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, इंग्रजी डाटा फीडिंग असलेल्या कार्डांचे बिल सहज निघत असल्याने अशा कार्डधारकांना धान्य मिळत आहे. मात्र मराठी भाषेत नावे नोंदवलेले लाभधारकांचे बिल मशिनवरून निघत नसल्याने दुकानदार धान्य वाटप करू शकत नाहीत. यामुळे दुकानदार आणि लाभधारकांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली असून, “मागील महिन्यात धान्य मिळाले, मग यावेळी का मिळत नाही?” असा प्रश्न लाभधारक विचारत आहेत.

या समस्येचा परिणाम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये ओयासिस कंपनीची ई-पॉज मशीन्स कार्यरत आहेत, त्याच ठिकाणी होत असल्याचे समजते. याबाबत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी सांगितले की, मंत्रालयातील संगणक कक्ष अधिकारी प्रज्ञा पटेल यांच्याशी संपर्क साधला असून दोन दिवसांत ही समस्या दूर होईल, असे वरिष्ठांनी कळवले आहे.

दरम्यान, अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक धान्य दुकाने यामुळे ठप्प झाली आहेत. धान्य वितरणाची अडचण तातडीने दूर करावी, जेणेकरून सर्व गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळेल, अशी मागणी फेडरेशनचे दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे आणि उत्तर नगर जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे यांनी केली आहे.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव