बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

प्रतिकात्मक चित्र 

शीतल टाइम्स प्रतिनिधी 

बेलापूर (प्रतिनिधी) :

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील कमलबाई आनंदा रणदिवे (वय अंदाजे ५५) या महिलेचा आज दुपारी रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील डोलाच्या प्रकरणात पैसे मिळत नसल्याने त्या वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारत होत्या. आजही त्या तहसील कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या मालधक्का परिसरातून रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांच्या साडीचा पदर रुळाला अडकला.

तेवढ्यात रेल्वे येत असल्याने सोबत असलेल्या दोन महिलांनी रुळ पार केला, मात्र कमलबाई रणदिवे यांच्या साडीचा पदर गुंतल्याने त्यांना रुळ ओलांडता आला नाही आणि त्या दुर्दैवाने रेल्वेखाली सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तहसील कार्यालयातील डोलाच्या प्रकरणातील विलंबामुळे त्या मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव