शीतल टाईम्स । - डॉ.अनिल मासुरकर जीवनावरील “अनमोल ठेवा”पुस्तकचे प्रकाशन शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी


डॉ.अनिल मासुरकर जीवनावरील “अनमोल ठेवा”पुस्तकचे प्रकाशन 

शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी 

     गुरुवारी झूम मिटवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात रूग्णाचे देव असणारे साखर कामगार व सेंट लुक हॉस्पिटल श्रीरामपूरचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मासुरकर यांच्या जीवनावर आधारित, त्यांचे बंधू सुधीर यांनी लिहिलेले, डॉ मासूरकर यांच्या स्नेहीनी आपल्या जीवनात त्यांचे अनुभव, मनोगत याबद्दल दिलेले लेख असलेले”अनमोल ठेवा”या पुस्तकाचे प्रकाशन दि १५ जुलै रोजी करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्र संचालन रश्मी व तनया जिंदल यांनी केले. यावेळी शैलजा वैद्य यांनी कविता सादर केली. सरोज नाईक या भगिनी म्हणाल्या मी चार वर्षाची असताना डॉ अनिल यांचा जन्म झाला. आज तोच आमचा दादा आहे.आमच्या करिता अनिलने जे केले त्याचे उपकार विसरू शकत नाही. बंधू सुधीर यांनी मोठ्या कष्टाने हे पुस्तक लिहिले आहे. स्व.डॉ सुमती मासूरकर यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले.डॉ उदय खांबेटे म्हणाले डॉ मासूरकर यांच्या मुळेच मला सेंट लुक हॉस्पिटलला काम करण्याची संधी मिळाली. माधव देशपांडे यांनी पण जुन्या आठवणीना उजाळा दिल्या. डॉ अनिल यांचे वडिलांनी हरिगाव येथे अशीच चांगली आरोग्य सेवा देऊन टीबी फंड काढून हजारो लोकांना जीवदान दिले. त्यांचेच संस्कार मुलाला मिळाले. भरतभाई ओझा, विश्वनाथ ओझा यांनी गझल शायरी म्हटली.कर्नल विजय खारकर यांनी डॉ अनिल यांच्या कार्याचा गौरव केला. कन्या शितल हिने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नाटेकर [सांगली], विलास रेडकर, गौतम सेन, डॉ मदन सोमाणी, सुधीर मासूरकर, कौसल्या मासूरकर, कर्नल विजय खारकर, माधव देशपांडे, आरोग्य मित्र भीमराज बागुल, डॉ उदय खांबेटे, डॉ उज्वल धुमाळ, डॉ शीतल मासुरकर, सरोज नाईक, शैलजा वैद्य, किशोर मासूरकर, भरत ओझा, विश्वनाथ ओझा, सिस्टर फिलू, फातिमा, सुरेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी