शीतल टाईम्स । - पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सह्यांची मोहीम केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी बेलापूर ।- शकील शेख यांजकडून
पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सह्यांची मोहीम
केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
बेलापूर ।- शकील शेख यांजकडून
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर, आमदार लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेत्रूत्वा खाली केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भावामध्ये केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ श्रीरामपुर तालुका विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, पंचायत समिती सदस्या वंदनाताई मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, कृउबा समितीचे संचालक सुधीर नवले,ऐनतपुर सोसायटी चेअरमन चंद्रकांत नाईक युवक तालुका उपाध्यक्ष अमोल नाईक, विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय नाईक, जिल्हा समन्वयक बाबासाहेब कोळसे, कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, काँग्रेसचे तालुकध्यक्ष वैभव संतोष कुऱ्हे, श्रीरामपुर शहारध्यक्ष अभिजित लिप्टे, देवळाली शहराध्यक्ष कुणाल पाटील, शुभम पाटील, सेवा संस्थाचे चेरमन अनिल नाईक, विजय शेलार, अय्याज सय्यद, बाळासाहेब भांड, आतिश देसर्डा, सद्दाम शेख, भाऊसाहेब तेलोरे, बाबासाहेब अमोलिक, श्याम चव्हाण, सुरेश कुर्हे, प्रकाश कुमावत, जाकीर शेख, सुरेश जाधव, विठ्ठलराव वाबळे, गौरव सिकची, संजय शेलार, बंटी शेलार, अनिल नवले, पोपट पवार, रमेश शेलार, गोविंद वाबळे, प्रताप गुजर, शुभम पाटील, समीर सय्यद, भाऊसाहेब तेलोरे , अतिश देसर्डा, गोविंद वाबळे, गौरव सिकची, सद्दाम शेख, चेतन कु-हे, बाळासाहेब लगे, सौरभ कापसे, अभी निर्मळ आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा