शीतल टाईम्स । - उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. सानप यांचा सत्कार सानप यांनी उत्तम कार्य करुन तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला - विजय भालसिंग शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

 

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. सानप यांचा सत्कार

सानप यांनी उत्तम कार्य करुन तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला - विजय भालसिंग

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

    अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला असून, त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला.

विजय भालसिंग म्हणाले की, नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. सहा. पो.नि. सानप यांनी उत्तमपणे कार्य करुन नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला आहे. नगर तालुक्यातील अनेक अवैध धंदे बंद झाले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नगर तालुक्यातील महामार्गावर होणारी लूट व चोर्‍याच्या घटना थांबविण्यासाठी त्यांचे उत्तमपणे नियोजन सुरु असून, या कार्यात देखील सहकार्य करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून झालेला सत्कार ही कामाची खरी पावती आहे. नगर तालुक्यातील महामार्गावरील लुटमार थांबविण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून युवकांना सज्ज केले जात आहे. वाळकी येथे देखील युवकांची टिम तयार करुन सदर युवक पोलीसांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


  • अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला असून, त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला.




******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी