शीतल टाईम्स । - पोलीसांनी कारवाई सुरु करताच 'ओव्हर टाईम' करणार्‍या दुकानदारांनी काढला पळ शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

 


पोलीसांनी कारवाई सुरु करताच 'ओव्हर टाईम' करणार्‍या दुकानदारांनी काढला पळ 

शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी 

   दुपारी चार नंतर  सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना गावात पाच वाजले तरी दुकाने सुरुच होती. पोलीसांनी कारवाई सुरु करताच अनेकांनी शटर बंद करुन पळ काढला.

   कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ठरवुन दिलेले नियम पाळणे बंधनकारक असताना बेलापूरात त्या नियमांचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला पाच वाजले तरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत होते दुकानेही उघडी होती तसेच सर्वत्र गर्दी दिसत होती ही बाब बेलापुर पोलीसांना समजताच हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त सुरु करताच अनेकांनी शटर बंद केली पोलीसांनी काही दुकानदारांना दंड केला अनेक लोक विनाकारण ठिकठिकाणी गप्पा मारत बसले होते पोलीसांना पहाताच अनेकांनी पळ काढला पोलीसांनी बेलापुर श्रीरामपुर चौकातील दुकानदारांना अनेक वेळा दंड करुनही ते दुकानदार दुकान उघडे ठेवत आहेत  त्यामुळे पोलीसांनी आता मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे या बाबत कामगार तलाठी कैलास खाडे या सर्व दुकानदारांना सक्त ताकीद दिली असुन शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकान सुरु ठेवल्याचे आढळल्यास एक महीन्याकरीता दुकान सिल करण्याची तोंडी सूचना सर्वांना देण्यात आलेली असल्याचे कामगार तलाठी खाडे यांनी पत्रकारांना सांगितले.



**********************************************
**********************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

**********************************************
**********************************************







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी