शीतल टाईम्स । - दिपक निकाळजे यांचे भीम गर्जनाच्या वतीने बेलापुरात स्वागत शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
दिपक निकाळजे यांचे भीम गर्जनाच्या वतीने बेलापुरात स्वागत
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने बेलापुर येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार सुहास शेलार यांची शितल टाईम्सच्या उपसंपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीण साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास वाघमारे. जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन शेख. उत्तर महाराष्ट्र संघटक सुनील शेळके, तालुकाध्यक्ष रफिक शाह, श्रीरामपूर शहराध्यक्ष फिरोज सय्यद, अझरुद्दीन शेख, मुनाफ पिंजारी, राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार किशोर कदम, लाडगाव शाखा अध्यक्ष आझम पटेल, मच्छिंद्र भालेराव, अनिल पवार, भैया पटेल, किरण भालेराव, संदीप भालेराव, समीर जाहागीरदार, जब्बार आतार, मुक्तार सैय्यद, मोईन खाजा शेख, किरण बोधक, मन्सूर शेख, सुलतान शेख, नौशाद शेख, आसिम शेख, हाजि मन्सूर सय्यद, मोईन शेख, तोफिक शेख आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा