शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेला 92 लाखांचा निव्वळ नफा - चेअरमन उमेश डावखर

      



शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

  पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी  पतसंस्थेला 92 लाखांचा निव्वळ नफा - चेअरमन उमेश डावखर


अहमदनगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेला सन 2020-2021 या आर्थिक वर्षात सुमारे 92 लाख 18 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उमेश सदाशिव डावखर यांनी दिली.


पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन 75 वर्षे झालेली असून, संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून, संस्थेची संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव या सभासदांच्या सोईसाठी चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेची सभासद संख्या 2019 असून, स्वतःचे भाग भांडवल 8 कोटी 42 लाख रुपये आहेत. संचित ठेवी रुपये 33 कोटी 61 लाख आहेत. वार्षिक उलाढाल 212 कोटी झाली आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संस्थेने सुमारे 74 कोटी 26 लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेला 2020-2021 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा 8 कोटी 51 लाख रुपये इतका झाला आहे. सर्व तरतुदी व खर्च वजा जाता संस्थेस सुमारे 92 लाख 18 हजार रुपये निव्वळ नफा झालेला असल्याचे चेअरमन उमेश डावखर व व्हाईस चेअरमन अजय लखापती यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


आर्थिक वर्षाअखेर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे मंजूर कॅश क्रेडिट रुपये 20 कोटी पैकी प्रत्यक्षात 32 लाख 32 हजार इतकी उचल झालेले असून, जिल्हा सहकारी बँकेस शेअर्स कोटी 2 कोटी 50 लाख व रिझर्व्ह फंड खाती 15 कोटी 63 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेच्या आकर्षक ठेवीचे व्याजदरमुळे मुदत ठेवी संस्थेत जमा होत आहेत. आर्थिक वर्षाअखेर संस्थेत सुमारे 40 कोटी 83 लाखांचे ठेवी जमा आहेत. संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक हिताची जपवणूक करून अत्यंत काटकसर व पारदर्शी कारभार केला असून, खर्चात जास्तीत जास्त काटकसर केलेली आहे. थकबाकी वसूल करणे व थकबाकी प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन या नात्याने काम करताना व्हाईस चेअरमन अजय लखापती, सर्व शाखा कार्यभार प्रमुख, संचालक मंडळ, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी न्यानेश्‍वर हळगावकर सभासद व संस्थेचे कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले आहे.

सभासदांसाठी एक वर्ष कालावधीकरिता 31 मार्च 2021 अखेरचे सभासदांचा चालू वर्षात रुपये 6 लाख रकमेचा वैयक्तिक अपघात विमा उतरवलेला आहे. विमा पॉलिसीची मुदत 9 एप्रिल 2022 अखेर आहे. सभासद कल्याण निधीतून मयत सभासदांच्या वारसास मदत म्हणून तीन लाख रुपये दिली जाते. तसेच चेअरमन फंडातून तात्काळ रुपये 5 हजाराची मदत दिली जाते. शिवाय हृदयशस्त्रक्रिया, किडनी रोपन, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर इत्यादी महत्त्वाच्या खर्चिक आजारासाठी धर्मदाय फंडातून पन्नास हजारांचे पुढे खर्च झाल्यास रुपये 2 हजार आर्थिक मदत केली जाते. संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष इंजि. जी.बी. नान्नोर, पदसिद्ध उपाध्यक्ष इंजि. एस.डी. पवार यांनी संचालक मंडळ, सभासद व कर्मचार्‍यांचे चांगल्या कारभाराबद्दल अभिनंदन केले आहे. संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये उपविधी दुरूस्ती सुचवीत सभासदांच्या मागणीवरून साधे कर्ज व तातडी कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्याचा  संचालक मंडळाचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************

संस्थेच्या प्रगतीपथावर असलेल्या उत्कृष्ट व पारदर्शी कारभारासाठी चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखपती, संगमनेर शाखा कार्यभार प्रमुख ललित पवार, श्रीगोंदा शाखा कार्यभार प्रमुख अभिमन्यु घोलवाड, श्रीरामपूर शाखा कार्यभार प्रमुख शिवाजी तोरणे, शेवगाव शाखा कार्यभार प्रमुख चंद्रकांत पडोळे, संचालक नारायणराव तमनर, नवनाथ घोंगडे, नामदेव बोरुडे, शांताराम आवारी, दीपक वाळके, यादव उदागे, राधाकिसन आभाळे, संजय गायके, दत्ताराम गडाख, सिताराम गागरे, गणेश बोबडे, राजेंद्र परदेशी, संचालिका प्रियंका मिसाळ, विजया शिंदे, तज्ञ संचालक दत्तात्रय वाघुले, भाऊसाहेब शेळके तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी न्यानेश्‍वर हळगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर शिंदे व कर्मचारी वृंद तसेच सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी