शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी 

 आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी

कास्ट्राईब महासंघाच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

अहमदनगर प्रतिनिधी  - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गट क व ड संवर्गासाठी सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जाहिरातीच्या माध्यमातून गट क साठी 2,725 तर गट ड साठी 3,466 पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी दि.20 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत असून, मागासवर्गीय मुलांना कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा परिषद येथील कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष के.के. जाधव व सरचिटणीस सुहास धीवर यांनी दिली.

कास्ट्राईब कार्यालयात सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अनेक गरजू घटकातील युवक-युवतींना ऑनलाईन अर्जाची पुर्तता करता येत नाही. सायबर कॅफेमध्ये अधिक शुल्क आकारले जात असल्याने या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कास्ट्राईब महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो (पांढरा बॅकग्राऊंड), ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आनण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन सचिव इरफान शेख 7028712916 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.








******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी