शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापुरात आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान


शीतल टाईम्स । प्रतिनिधी

बेलापुरात आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान

बेलापूर:-(प्रतिनिधी) येथे माजी मंत्री आ.राधाकृष्ण  विखे पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची सेवा करणारे कोरोना योद्ये हेच खरे देवदूत आहेत, असे गौरोद्गार आ.विखे पाटील यांनी काढले. 


 बेलापूर खुर्द येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाच्यावतीने कोराना काळात जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बेलापूर खुर्द चे ग्राम विकास अधिकारी सी डी तुंबारे, माजी सरपंच अनुराधा गाडे, कामगार तलाठी, विकास शिंदे, पोलीस पाटील युवराज जोशी, उमेश बारहाते, बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवीदास चोखर, डॉक्टर सी पी गडाख, श्रीमती के एल बाचकर, धिवर मॅडम, आशा सेविका विमल माने, संगीता पुजारी, उषा गुलदगड, अविष्का भालेराव, मनीषा थोरात, इंदुबाई पुजारी, मंगल विधाने, जयश्री पुजारी, उज्वला पुजारी, यमुना पुजारी, कुसुम भगत, चंद्रकला महाडिक, सफाई कर्मचारी लिलाबाई पगारे, रोहिणी थोरात, कोतवाल सुनील बारहाते, क्लर्क विकी जाधव, संगणक ऑपरेटर सौ वर्षा सांगळे, कविता बडदे, ग्रामपंचायत शिपाई सिताराम महाडीक, शिवाजी गाडे, पाणीपुरवठा कर्मचारी राजेंद्र पुजारी, संतोष महाडिक, घंटागाडी कर्मचारी दीपक महाडिक, चंद्रकांत मते, फवारणी कर्मचारी बाळासाहेब पुजारी, नारायण काकडे, गॅस पुरवठा कर्मचारी रामेश्वर थोरात, पोलीस हवालदार अतुल लोटके, गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, हरीश पानसंबळ, निखिल तमनर, पोपट भोईटे, महावितरण कर्मचारी रवींद्र रवंदळ, चेतन जाधव, ॲम्बुलन्स चालक संतोष शेलार, रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करणारे कल्याण कुंकूलोळ, राजेंद्र कुंकूलोळ, अॕड जीवन पांडे, विकी जैन, माजी उपसरपंच प्राध्यापक अशोक बडधे, मीडिया प्रतिनिधी पत्रकार अशोक शेलार, ऋषिकेश महाडिक, जितू महाडिक, संतोष बारहाते, माजी उपसरपंच सचिन थोरात आदी कोरोना योद्ध्यांचा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी केशव आप्पा जोशी, दिपक पटारे, शरद नवले, नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, बाळासाहेब तोरणे, गिरीधर आसने, सौ.प्रणाली विनय भगत, सौ.पुष्पाताई हरदास आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश संचेती, विलास भालेराव, अॕड दीपक बारहाते, समीर सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.गायत्री म्हस्के यांनी केले. प्रास्तविक अॕड दिपक बारहाते यांनी केले तर समीर सय्यद यांनी आभार मानले.


माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूरातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी देविदास देसाई, नवनाथ कुताळ, सुनील नवले, सुहास शेलार, प्रदिप आहेर, दिलीप दायमा, किशोर कदम, सुधीर तेलोरे आदी.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी