शीतलटाईम्स - श्रीरामपूर शहरातील अस्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीच्यावतीने उपोषण शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)

      



शीतल टाईम्स । प्रतिनिधी


श्रीरामपूर शहरातील अस्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीच्यावतीने उपोषण 


शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी) 


सध्या शहरात पसरलेली कमालिकी अस्वच्छता त्यावर घन-कचरा ठेकेदाराची मनमानी आणि त्याची पाठराखण करणारे नगर पालिका प्रशासन याविरोधात सोबतच बेजबाबदार संबंधित घन-कचरा ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर नगर पालिकेसमोर समाजवादी पार्टीच्यावतीने उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्युब पठाण, तौफीक शेख, सलीम शेख,ज़करिया सैय्यद,अरबाज़ कुरैशी,रईस शेख, फैज़ान काजी, साद पठाण, इमरान शेख, अल्तमश शेख, भारत खंडागळे, मतीन शेख, अब्दुल सैय्यद, राजु शेख,उपोषणाला बसले आहेत.


शहरातील नागरीकांचे केवळ मतदानापुरतेच उपयोग करणारे आणि प्रत्येक्षात मात्र कधी आपल्या प्रभागात तोंड न दाखवणारे काही नगरसेवक स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून केवळ उद्घाटन फोटोतच मिरवून घेताना दिसून येत आहे,मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे संभव्य पसरणाऱ्या रोगराईचे त्यांना काहीच घेणे-देणे नाही अशा बेजबाबदार नगरसेवकांना येत्या निवडणुकीत शहरातील जागरुक जनता योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जरी सत्य असले तरी, हल्ली शहरातील अस्वच्छता रोगराईस निमंत्रण देत असून यावर तात्काळ नगर पालिकेचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी समाजवादी पार्टीच्यावतीने नगर पालिकेसमोर आमरण उपोषण केले जात आहे.

शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेने दुर्लक्ष करावे आणी राजकीय पक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्यांना शहरातील अस्वच्छतेबाबत उपोषण करण्याची वेळ यावी हे शहरवासियांचं अत्यंत दुर्देव म्हटल्यास वावगे ठरणार नाही,

शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने आपले गट, तट, पक्ष,संघटना या सर्व बाबी बाजूला ठेवून सर्वांनीच जनतेच्या आरोग्यप्रश्नी आवाज उठविणे आज गरजेचे ठरत आहे, म्हणून या उपोषणास कामगार नेते नागेशभाई सावंत,करण ससाणे, संजय छल्लारे, तिलक डूंगरवाल, राजेंद्र सोनवणे,सागर दुपाटी रज्जाक पठाण,फिरोज पठाण, जावेद तांबोळी, अबुल मान्यार रियाजखान पठाण,सोनो सैय्यद, सलिम शेख,अजय जनवेजा, नितिन बनसोडे, शेख शाकिब, रईस शेख, अभिजित सोनवणे, तौफीक शेख, फैज़ान काज़ी, अब्दुल सैय्यद, शेहेजाद शेख, अ.भा.कॉंग्रेस पार्टी,आमआदमी पार्टी,भारती लहूजी सेना, प्रहार जनशक्ति,अलफतेह ग्रुप,जे. जे. फाऊंडेशन, आशा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याने संबंधित नगर पालिका प्रशासनास शहरातील ज्वलंत नागरी समस्यांकडे लक्ष देणे भाग पडणार असल्याचेही यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी