शीतलटाईम्स - तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा 'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा ऱ्हास होतोय ! - पत्रकार देविदास देसाई शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा
'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा ऱ्हास होतोय ! - पत्रकार देविदास देसाई
शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)
ज्यांना लहानचे मोठे केले, त्याच दिवट्यांनी वृध्द माता पित्यांना हाकलून द्यावे हे दुर्दैव असून, ज्याचा रक्ताचा, जातीचा, धर्माचा कुठलाही संबध नाही, त्याने त्यांचे संगोपन करावे हे अशा दिवट्यांच्या मानसिकतेवर प्रहार आहे ! प्रगत युगात वृद्धाश्रमांची गरज भासावी! यातून 'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला की काय अशी शंका पंत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केली. श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस श्रीरामपुर येथील वृध्दाश्रमात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयाती श्रीमती चारुशिला मगरे या होत्या या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की माऊली वृध्दाश्रमाचे संचालक सुभाष वाघुंडे हे वृध्दांचा आधारवड बनले आहे. या वृध्दाश्रमात आज १५ वयोवृध्द आहेत. अनेक जण आपला वाढदिवस जोरदार साजरा करतात परंतु सुभाष वाघुंडे यांना दररोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेने काढ दिवस साजरा करावा लागतो आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून दानशूरांनी पुढे येवुन या वृध्दाश्रमास मदत करावी. आसे अवाहनही देसाई यांनी केले या वेळी पत्रकार चंद्रकांत झुरंगे, भाऊसाहेब वाघमारे, श्रीमती चारुशिला मगरे, माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास नरेंद्र खरात, योगेश गंगवाल, अजिज शेख, सुभाष सांळूंके, सुभाष चोरडीया, नाना मोरे, संतोष पारखे, राहुल पगारे, पत्रकार सुहास शेलार, किशोर कदम, विकी काळे, मुरलीधर वधवाणी, अरुण खंडागळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी केले, तर चंद्रकांत झुरंगे यांनी आभार मानले.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
******************************************************
******************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा