शीतलटाईम्स - 'अशोक' च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
'अशोक' च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
शीतल टाईम्स । अशोकनगर प्रतिनिधी
जागतिक स्तरावर साखर उत्पादन घटल्याने साखरेच्या मागणीत वाढ होवून भाव वाढण्याचे आशादायक चिन्ह आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने साखर उत्पादनासह कच्च्या साखर निर्मितीबरोबरच इथेनॉलला केन्द्र शासनाने चांगले भाव जाहिर केल्याने अधिकाधिक इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाणात वाढ करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याने इथेनॉल प्रकल्पाच्या सध्याच्या उत्पादन क्षमतेत प्रतिदिन एक लाख लिटर्सपर्यन्त वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री.मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले की, साखर कारखानदारी हा धंदा असून ऊसाचा भाव हा उत्पन्न व खर्च याचा हिशोब करुन ठरतो. संजीवनी, कोपरगाव व प्रवरा कारखाना देशी दारुचे उत्पादन करीत असल्याने ते जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा जादा भाव देऊ शकतात. आपल्या कारखान्याने आजवर जिल्ह्यातील चांगल्या कारखान्याच्या जवळपास भाव दिलेला आहे. यंदाच्या हंगामात संघटनांनी एक रकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केलेली आहे याबाबत शासन स्तरावर जो निर्णय होईल, त्यानुसार कारखाना अंमलबजावणी करील.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा याबद्दल दुमत नाही.माञ मागील हंगामात साखरेला उत्पादन खर्चापेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागला याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काळाची पावले ओळखून कारखान्याने कारखाना व्यवस्थापनाने साखर उत्पादनाबरोबरच अल्कोहोल, इथेनॉल व वीज निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले.काळानुसार बदल स्विकारल्याने कारखाना सुस्थितीत राहिला.अन्यथा वैजापूर, गंगापूर, राहुरी, गणेश, पारनेर आदी कारखान्यांसारखी वेळ आली असती. यंदाच्या गळीत हंगामात रॉ शुगरला मागणी असल्याने रॉ शुगरच्या उत्पादनावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. तसेच इथेनॉलला प्रतिलिटर ५७ रुपये असा चांगला दर केंद्र शासनाने जाहीर केल्याने इथेनॉल निर्मितीवरही भर दिला जाणार आहे. केंद्र शासन पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाणात भविष्यात वाढ करणार असल्याने पुढील गळीत हंगामात इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन एक लाख लिटर्स पर्यंत वाढविण्याचा मानस आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठेवीवरील व्याज तसेच कामगारांना बोनस देण्यात येणार आहे. ' कोणी कितीही अपप्रचार आणि खोटेनाटे मेसेजेस फिरविले तरी गेली ३५ वर्षे सभासदांच्या विश्वासाला तडा जावू न देता कारभार केला असल्याने येथून पुढच्या काळातही सभासद आपल्यालाच पाठबळ देतील, असा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला. कारखान्याचे प्रमुख अतिथी कामगार सभेचे सचिव अविनाश आपटे म्हणाले की, साखर कारखानदारी अडचणीत असताना मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली कारखाना प्रगतीपथावर आहे. कारखान्याचे कामगार सहनशील आहेत, असे असले तरी कामगारांचे थकीत वेतन अदा करावे. कारखानदारांचा विरोध असताना मुरकुटे यांनी बारा टक्के पगारवाढीसाठी शरद पवार यांचेकडे आग्रह धरला आणि सदर वेतनवाढ मंजूर करुन घेतली याबद्दल श्री.आपटे यांनी मुरकुटे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी केले. याप्रसंगी माजी कामगार संचालक काशिनाथ गोराणे, एन.डी.बडाख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संचालक नितीन बनकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.किर्तीताई बनकर तसेच कार्यकारी संचालक संतोष देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्वातीताई देवकर यांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन झाले. संचालक बबनराव मुठे यांच्या अध्यक्षीय सूचनेस दिगंबर तुवर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अॅड्.सुभाष चौधरी, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, गोरख ताके, सौ.मंजुश्री मुरकुटे, प्रा.सौ.सुनिता गायकवाड, सौ.वंदना राऊत, शिवसेनेचे डॉ.महेश क्षीरसागर, सचिन बडधे, तिलक डुंगरवाल, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, ज्ञानदेव साळुंके, बाबासाहेब काळे, अशोक मिल्कचे चेअरमन श्रीधर कोलते, अॅड्.पृथ्वीराज चव्हाण, अॅड्.उमेश लटमाळे, पंढरीनाथ पटारे, आण्णासाहेब चौधरी, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब ढोकचौळे, दिगंबर शिंदे, दौलतराव बनकर, अॅड्.डी.आर.पटारे, ज्ञानदेव पवार, केशवराव चव्हाण, गोकुळ औताडे, विनायक भालदंड, प्रभाकर कुर्हे, सोपानराव कांगुणे, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, प्रभात कुर्हे, प्रकाश नवले, दादासाहेब कुताळ, श्रीमती जानकाताई उंडे, सौ.मिराताई बडाख, सौ.शालिनी कोलते, सौ.वनिता काकडे, भाऊसाहेब बनसोडे, अच्युतराव बनकर, निवृत्ती थोरात, राम पटारे, पांडूरंग शिंदे, अच्युतराव बडाख, बाळासाहेब गोराणे, गोविंद तांबे, अतुल तांबे, रामदास पटारे, रविंद्र बनकर, शनैश्वर पवार, आशिष दोंड, सखाहरी शिंदे, मच्छिंद्र भोसले, सुधाकर खंडागळे, बाळासाहेब नाईक, सोपानराव नाईक, शिवाजी मुठे, कचरु औताडे, शिवाजी औताडे, कचरु आदिक, बाबासाहेब आदिक, सर्जेराव पवार, बाळासाहेब दांगट, बी.डी.बडाख, युवराज थोरात, वसंतराव टेकाळे, रमेश पटारे, दादासाहेब राऊत, राहुल बनकर, माणिकराव पवार, साहेबराव चोरमल, जालिंदर कुर्हे, ज्ञानदेव कसार, मच्छिंद्र वाकचौरे, नितीन दांगट, नानासाहेब मांढरे, सोपानराव गायकवाड, दशरथ पिसे, कल्याण लकडे, बाबासाहेब पवार, वसंतराव शेरकर, मिराताई पारधे, कचरु वाघचौरे, प्रदीप जाधव, विनायक भालदंड, भाऊसाहेब हळनोर, यासिन सय्यद, सखाराम कांगुणे, चंद्रभान पवार, गणेश भाकरे, अल्ताफखान पठाण, विश्वनाथ वाघ, गोपीचंद भागडे, जयंत दुशिंग, एकनाथ कालंगडे, बापुराव आढाव, रामभाऊ कसार, नारायण बडाख, शिवाजी दोंड, महेश पटारे, महेश कुर्हे, राजेंद्र पवार, बाबासाहेब कोल्हे, लहानुभाऊ शेजुळ, गोरख गवारे, रंगराव रंजाळे, सखाहरी कांगुणे, दत्तू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, भागवतराव पवार, भागवतराव पटारे, बजरंग दरंदले, नबुतात्या लवांडे, गोरख बारहाते, पंढरीनाथ पटारे, बाळासाहेब जाधव, रणजित बनकर, अॅड्.कचेश्वर बडाख, नामदेव बडाख, विनायक भालदंड, मदन बहिरट, कचरु वाकचौरे, बाळासाहेब कमळाजी, दत्तात्रय भांड, फकिरा वरुडे, सुभाष मुठे, सुरेश व रमेश अमोलीक, शांतीनाथ टेकाळे, प्रा.रमेश पटारे, काशिनाथ जाधव, कुंडलीकराव मुठे, संपतराव मुठे, हरीभाऊ बडाख, पंढरीनाथ मते, परसराम खंडागळे, माणिकराव शिंदे, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मणराव बडाख, राहुल बनकर, वसंत शेरकर, दादासाहेब गांगुर्डे, लताबाई गांगुर्डे, बाबुराव सुडके, किरण गायधने, अमर ढोकचौळे, रमेश ढोकचौळे, सुनिल पटारे, रमेश पटारे, अरुण साळुंके आदींसह कारखान्याचे सभासद, हितचिंतक, महिला, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कामगार उपस्थित होते.
****************************************************
****************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
****************************************************
****************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा