शीतलटाईम्स - गळनिंब ची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
गळनिंब ची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
शीतल टाईम्स । प्रतिनिधी गळनिंब
गावाचा सन २०२२-२३चा विकास आराखडा तयार करणे, सुधारीत वाड्या वस्त्यावरील पाणी योजना, गावांतर्गत रस्ते गटारी व वाडी वस्त्यावरील रस्ते, राष्ट्रीय तंबाखू नियंञण कार्यक्रमाची अंमलबाजावणी सामाजिक न्याय विभाग नवबौध्द घटकांचा विकास आदी विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन गळनिंब ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
ग्रामसभा सरपंच शिवाजी चिंधे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रवरा बॅंकेचे मा.संचालक, हनुमान चिंधे, सुनिल शिंदे, डाॅ.सुनिल चिंधे, कैलास मारकड, दादा जाटे, गणेश देठे, रामदास भोसले, साहेबराव भोसले, संदिप शेरमाळे, सदस्य दत्तात्रय माळी, प्रा.बाळासाहेब वडितके, सौ.अनिता शेरमाळे, सौ.कविता चिंधे, संजय शिंदे, ग्रामसेवक राजू ओहोळ, आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी सुनिल शिंदे यांनी लसिकरणात नागरीकांनी सहभागी होण्यासाठी व लसिकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सुचविले. सोहम चिंधे यांनी गावातील दुषित होणारा पाणीपुरवठा व गावठाणातील रस्त्यांवरील कचरा, उकंडे या विषयी सुचना केल्या. सदस्य बाळासाहेब वडितके यांनी ग्रामपंचायत थकबाकी वसूली बाबत कठोर निर्णय घेण्यासंबधी सुचना केल्या. दादासाहेब जाटे व कविता चिंधे यांनी वाड्या वस्त्यांवरील रस्ते व पाणीपुरवठ्याबाबत सुचना केल्या. साहेबराव भोसले यांनी गावठाणात होणार्या पाणी पुरवठ्याबाबत नियोजन करण्यासंबधी सुचना केल्या. आदी विषयावर साधक बाधक चर्चा झाली.
विषयपञिकेवरील आमचा गाव आमचा विकास, कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु करणे, मध्यंतरी झालेला जलजीवन मिशन सर्व्हेची सविस्तर माहीती ग्रामसेवक ओहोळ यांनी दिली. तसेच अपूर्ण घरकुल बांधकामे, पुर्ण झाल्याची माहीती यावेळी दिली. यासह विविध विकास कामांचा आढावा घेवून चर्चा झाली.
यावेळी केरूनाना शिंदे, बापू वडितके, साहेबराव चिंधे,दिपक जाटे,मुख्यध्यापक नान्नोर सर,अर्जून बाचकर, कृषी सहाय्यक पाटील साहेब, ग्रंथपाल सुभाष भोसले, मनोज तुपे, विकास तुपे, शुभम वडितके, विठ्ठल वडितके, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी आदी उपस्थित होते.
****************************************************
****************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
****************************************************
****************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा