शीतलटाईम्स - डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरणाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा भीमगर्जना संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा फिरोज पठाण यांचा इशारा शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन !
डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरणाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा
अन्यथा भीमगर्जना संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा फिरोज पठाण यांचा इशारा
शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये झालेल्या डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरण हे कामे अंदाज पत्रकाप्रमाणे झालेली नाहीत. शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता व बेकायदेशीररित्या रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून मुरूम उत्खनन केलेले आहे व सदर भागातील सर्व खडीकरण मुरमीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. रस्ते बनवण्याकरिता निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून केले असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
वरील सर्व झालेली कामे शासकीय प्रयोग शाळा व क्षेत्रीय प्रयोगशाळा यांच्याकडून तपासणी करण्यात यावी व अधिकारी संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा