शीतल टाईम्स //बेलापूर महाविद्यालयातील मीनल शेलार आणि श्रुती सराफ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
बेलापूर महाविद्यालयातील मीनल शेलार आणि श्रुती सराफ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक
शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष शाखेचे विद्यार्थीनी मीनल राजेंद्र शेलार, श्रुती विकास सराफ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेतील एप्रिल मे 2022 या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेत "ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी" विषयाचे सुवर्णपदक मिळाले आहे. दोघींनीही कै.मधुसूदन अच्युत केळकर स्मृती सुवर्णपदक आणि एस.बी झावरे सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके, उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, सचिव ॲड.शरद सोमाणी, खजिनदार हरिनारायण खटोड, सहसचिव दिपक सिकची, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्रप्रसाद उर्फ नंदूशेठ खटोड, भरत साळुंके, ॲड.विजय साळुंके, प्रेमा मुथ्था, चंद्रशेखर डावरे, रविंद्र खटोड, श्रीवल्लभ राठी, नारायणदास सिकची, राजेंद्र सिकची, प्रा.हंबीरराव नाईक, सौ.सुविद्या सोमाणी, शिक्षक प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरगे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, वाणिज्य विभाग प्रमुख व अकाउंटन्सीचे विषय शिक्षक प्रा.प्रकाश देशपांडे, डॉ.अशोक माने, डॉ.भाऊसाहेब पवार, सर्व प्राध्यापक, प्राध्यापेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
***************************************************
***************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
***************************************************
***************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा