शीतल टाईम्स //महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने योगेश मसलगे पाटील यांचा सन्मान शीतल टाईम्स प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने योगेश मसलगे पाटील यांचा सन्मान

शीतल टाईम्स प्रतिनिधी 


शीतल टाइम्स प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्यात लोकसभा 2024 निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चागले यश मिळाले आहे. त्या अनुषंगाने सर्व सेलच्या वतीने राज्याचे प्रभारी रमेशजी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या उपस्थितीत दिनांक 03/07/24 रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर पश्चिम येथे राज्यस्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा 2024 निवडणुकीत  रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेसच्या वतीने योगेश मसलगे पाटील यांच्या नेतृत्वा खाली राज्याच्या कानाकोपऱ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारकार्य, निवडणुक काळात पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्ट पणे पार पाडली. तसेच, काँग्रेस गॅरंटी कार्ड याचा प्रचार, प्रसार घराघरात पोचविले गेले. त्यामुळे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या त्याबद्दल मसलगे पाटील यांना प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते फेटा, शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


एक कार्यकर्ता ते महाराष्ट्राच्या एका विभाग प्रमुख पर्यंत प्रवास अतिशय खडतर होता. कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना सामान्य कुटुंबांतील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने दिलेला हा बहुमान अभिमानाची बाब आहे. हे फक्त काँग्रेसच करू शकते त्यांचा प्रामाणिकपणा, पक्ष निष्ठा, नम्रपणा, साधेपणा, अथक परीश्रम, कायम कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून देऊन काम केले त्याचे हे फलीत आहे. राज्यातील रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सर्व विभागाच्या प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक, तालुका, वॉर्ड, गट, गण प्रमुख इ कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. प्रदेश अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग ही माहिती सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा सरचिटणीस श्री संतोष मुळे यांनी दिली.









***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी