शीतल टाईम्स //महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे- राजेंद्र आंधळे आजपासून महसूल विभागाचे कामकाज सुरळीत शीतल टाईम्स अहमदनगर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे- राजेंद्र आंधळे

आजपासून महसूल विभागाचे कामकाज सुरळीत

शीतल टाईम्स अहमदनगर प्रतिनिधी

अपर मुख्य सचिव, महसूल यांचेशी महसूल कर्मचारी संघटनेशी प्रलंबित मागण्या बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी दांगट समितीचा अहवाल मान्य असले बाबत व आकृतिबंध वित्त विभागा कडून मान्य करून घेण्या बाबत महसूल विभागाची भूमिका स्पष्ट केली.

तसेच अव्वल कारकून नाव बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे पद नाव करणे बाबत सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेस अधीन राहून शासन निर्णय परीत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

तसेच नायब तहसीलदार व महसूल सहायक वेतन त्रुटी बाबत शासन सकारात्मक असून वित्त विभागीची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही होईल. तसेच सुधारित परीक्षा धोरण, करून विभागास एकच परीक्षा घेण्या बाबत अनुकूलता दर्शविली आहे. यावेळी महसूल मंत्री यांच्यासोबत महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे महसूल मंत्री यानी स्पष्ट केले. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. उद्यापासून महसूल विभागाचे कामकाज सुरळीत होईल. यावेळी महसूल राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर व समन्वयक राजू धांडे, उपाध्यक्ष अक्षय फलके यांनी संघटनेची बाजू मांडली. तसेच मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अध्यक्ष विश्वस काटकर यांनी संघटनेचे प्रश्न  माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यासमोर मांडले. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने  महसूल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे हे उपस्थित होते.  









***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी