शीतल टाईम्स //बेलापुरात एकाच रात्रीत साई मंदिराच्या दानपेटीसह चांदीच्या पादुका व बस स्टॅन्ड समोरील अनेक रिक्षामधील बॅटऱ्या चोरीला शीतल टाईम्स बेलापुर प्रतिनिधी

बेलापुरात एकाच रात्रीत साई मंदिराच्या दानपेटीसह चांदीच्या पादुका व बस स्टॅन्ड समोरील अनेक रिक्षामधील बॅटऱ्या चोरीला

शीतल टाईम्स बेलापुर प्रतिनिधी


शीतल टाइम्स प्रतिनिधी

काल रात्री चोरट्यांनी बेलापुर येथील श्री साईबाबा मंदीर, हनुमान मंदिर येथे चोरी केली असून बेलापुर गावात बस स्टँड समोर नंबरला उभ्या असलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथील दोन रिक्षा अशा एकुण अकरा रिक्षामधील बॅटऱ्या तसेच एका रसवंती गृहामधील ईन्व्हटर व तेथील बॅटरीही चोरट्यांनी लांबविली. घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

याच चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे.

बेलापुर येथील श्री साईबाबा मंदिरात चोरट्यांनी समोरुन प्रवेश केला मंदिंराला लावलेले कुलूप तोडून मंदिरात असलेल्या साईबाबांच्या चांदीच्या पादुका तसेच दानपेटी घेवुन चोरटे फरार झाले मंदिराच्या काही अंतरावरच ती दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली असून त्यातील रक्कम घेवुन चोरटे पसार झाले तसेच गावातील एस टी बस स्टँडसमोरील नंबरसाठी लावण्यात आलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षा अशा अकरा रिक्षाच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. जाताना रामगड जवळ असणाऱ्या हनुमान मंदिरातही उचकापाचक केली, तेथील दानपेटीत काही नसल्यामुळे त्यांनी दानपेटी तशीच ठेवली. परंतु मंदीरात असलेले छोटे कपाटाचे कुलुप तोडून उचकापाचक केली तसेच बेलापुर रोडवर नव्यानेच झालेले कोहीनुर रसवंती गृह येथील ईन्व्हटर व बॅटरी घेवुन चोरटे पसार झाले असुन अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्या करुन चोरट्यांनी बेलापुर पोलीसांना अव्हानच दिले आहे. काही दिवसापूर्वी रामगड येथील ओहोळ यांच्या घरात दिवासा चोरट्यांनी दागीने व रोख रक्कम घेवुन पोबारा केला होता. त्या घटनेचाही अजुन तपास लागलेला नाही. या घटनेची माहीती मिळताच ग्रामस्थ खबर देण्यासाठी बेलापुर पोलीस स्टेशनला गेले. असता अनेक वेळा आवाज देवुनही पोलीस स्टेशनला असलेला कर्मचारी झोपेतुन उठला नाही. गावात रात्रीची गस्तही बंद झालेली आहे. अनेक ठिकाणी आडवी तिडवी वहाने उभी असतात रहदारीला अडथळा निर्माण होतो परंतु रात्रीही अन दिवसाही पोलीस गावात फिरकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी तर झेंडा चौकात प्रचंड गर्दी होते तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे लोकही तक्रार करण्यास पोलीस स्टेशनला जात नाही. बेलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा परिसर आहे त्यामुळे येथे कार्यक्षम पोलीसांची नियुक्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


या रिक्षांच्या बॅटऱ्या रात्री चोरुन नेण्यात आल्या आहेत.

१)अक्तर शेख एम एच१७ ९६३० 

२)कमरुद्दीन शेख एम एच २०डब्लू ४४०६

३)स्वप्निल अमोलीक एम एच १७ के ९६६३                              

४)तौसीफ आतार एम एच १७ टी ८१९४                                   

५) अफरोज शेख एम एच १७ टी ५६७०                                

६) रिजवान आतार एम एच १७ टी५९०५                                    

७)शकुर शेख एम एच १७ टी ५१६६                                       

८)आसीफ शेख एम एच १७ के ६३२१                                       

९)राजु बागवान एम एच १७ टी६४७६                                   

१० )जावेद शेख एम एच १७ टी ६४९७                                       

११)  फिरोज शेख एम एच १७ टी ५८१४

या अकरा रिक्षामधील बॅटऱ्या चोरीस गेलेल्या आहेत.










***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी