शीतल टाईम्स //बदलापुरातील अत्याचाराचा बेलापुरात निषेध शीतल टाईम्स बेलापुर (प्रतिनिधी)
बदलापुरातील अत्याचाराचा बेलापुरात निषेध
शीतल टाईम्स बेलापुर (प्रतिनिधी)
बदलापुर येथील घटनेचा बेलापुरातील विविध संघटना तसेच गावातील युवकांनी काळ्या फिती लावुन जाहीर निषेध केला, तसेच आरोपीवर दाखल केलेला खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. आपल्या परिसरात अशा घटना घडू नये या करीता पोलीस प्रशासनाने शाळा काॅलेज मधुन गस्त वाढवावी तसेच शाळा काॅलेज मध्ये तक्रारपेटी बसविण्यात यावी जेणे करुन अशा घटनाना आळा बसेल अशीही मागणी करण्यात आली.
या वेळी बेलापुर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक विक्रम नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, रफीक शेख, पत्रकार देविदास देसाई, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, विशाल मेहेत्रे, मयुर खरात, अक्षय नाईक, कैलास औटी, राफीक शहा, नितीन अमोलीक, गौरव वाकडे, रोहन शेलार, शहानवाज सय्यद, दिपक पुंड, अजय वायदंडे, तौफीक शेख, आमोल जाधव, योगेश काळे, किरण अमोलिक, सोनु शेलार, कुमार फुलमाळी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शीतल टाइम्स प्रतिनिधी
***************************************************
***************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
***************************************************
***************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा