शीतल टाईम्स//करजगावच्या सरपंचपदी रतनबाई आरंगळे बिनविरोध शीतल टाईम्स आंबी प्रतिनीधी
करजगावच्या सरपंचपदी रतनबाई आरंगळे बिनविरोध
शीतल टाईम्स आंबी प्रतिनीधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगावच्या सरपंचपदी राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती वेनुनाथ कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली रतनबाई बाळासाहेब आरंगळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार राहुरी यांनी प्राधिकृत केलेले निवडणूक अध्यासी अधिकारी व देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव यांनी काम पहिले. त्यांना तलाठी प्राजक्ता रामफळे, ग्रामसेवक भारत पटारे, कोतवाल राजेंद्र चक्रनारायण यांनी सहकार्य केले. सरपंच पदाची सूचना ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कोतकर यांनी मांडली तर त्यास अनुमोदन उपसरपंच आण्णासाहेब देठे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री नवनाथ कोतकर, माजी सरपंच गणेश दिगंबर कोतकर, उपसरपंच आण्णासाहेब काशिनाथ देठे, सुजाता सचिन लोंढे, भारती राधाकिसन कोतकर हे उपस्थित होते.
यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात नवनियुक्त सरपंच रतनबाई आरंगळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी करजगाव सोसायटीचे माजी चेअरमन चांगदेव कोतकर, इस्माईल पठाण, पंढरीनाथ कोतकर, साहेबराव देठे, चांदभाई पठाण, बाळासाहेब आरंगळे, बाबासाहेब कोतकर सुरेश कोतकर, दिलीप आरंगळे, आविनाथ आरंगळे, त्रिंबक कोतकर,साईनाथ कातोरे, बाळासाहेब पवार, जयसिंग आरंगळे योगेश आरंगळे, पत्रकार संदीप पाळंदे यांसह कुबेरेश्वर मंडळ, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, तरुण मंडळ, ग्रामस्त यांनी आरंगळे यांचे अभिनंदन केले.
*******************************************
*******************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
********-संपर्क-********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************
*******************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा