शीतल टाईम्स//बेलापूर बुll ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच 'महिला राज' सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली तबसुम बागवान यांची बिनविरोध निवड शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

बेलापूर बुll ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच 'महिला राज'

सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली तबसुम बागवान यांची बिनविरोध निवड

शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी



शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत महसूलमंत्री नाम. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील तसेच शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालिल गावकरी मंडळाच्या सौ.तबसुम शफिक बागवान यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच पदावर स्वाती अमोलिक ह्या असल्याने बेलापूर ग्रामपंचायतीत 'महिला राज' दिसणार आहे.
बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार (ता.२९)रोजी निवडणुक झाली. या निवडणुकीसाठी सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदर बैठकीस अभिषेक खंडागळे, मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, सुशिलाबाई पवार, मीना साळवी, वैभव कुऱ्हे, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक हे सदस्य, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे उपस्थित होते. निवडणुकीसाठी जि.प.सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.तबसुम शफिक बागवान यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सौ.बागवान यांची बिनविरोध निवड झाली
निवडीनंतर बोलताना शरद नवले म्हणाले की, सदरचा विजय हा गावकरी मंडळाच्या एकजुटीचा आहे. गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे धोरण ठेवले आहे. ज्या घटकांना संधी मिळाली नाही त्यांना पुढील काळात संधी दिली जाईल. गावकरी मंडळ एकदिलाने गावाच्या विकासाची कामे करीत आहेत. मात्र विरोधक तथ्यहिन तक्रारी व बिनबुडाचे आरोप करुन विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहिजण ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अपप्रचार करुन राजकीय बदनामीचे कटकारस्थान करीत आहेत. त्याला न जुमानता राज्याचे महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे मार्गदर्शनाखाली आजवर झाली नाहित अशी विकास कामे होत आहेत. १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना व विविध कामांसाठी ४३ एकर जमिन शासनाकडून मोफत मिळाली आहे. विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी काय दिवे लावले हे गावाला ठाउक आहे. त्यामुळे कितीही मांजरे आडवी गेली तरी गावाच्या विकासाचा रथ हा यापुढेही चालू राहिल असे ते म्हणाले.
अभिषेक खंडागळे म्हणाले की, महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी गावाला भरभरुन माप दिले आहे. यामुळेच ऐतिहासिक पाणी पुरवठा योजना, घरकुलांसाठी जागा, भुयारी गटारे, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प अशी विकास कामे मार्गी लागली आहेत. स्वतःकडे सत्ता असताना गाव भकास करणारांना आता पोटदुखी होत आहे. मिटींगमध्ये मंजुरी द्यायची आणि दुसरीकडे तक्रारी करीत ग्रामस्थांची दिशाभूल करायची असा दुटप्पीपणा विरोधक करीत आहेत. त्यांच्या आरोपांना विकासकामे करुन उत्तर देवू असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रफुल्ल डावरे, रावसाहेब अमोलिक, मोहसीन सय्यद आदिंची भाषणे झाली. यावेळी जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, भास्करराव खंडागळे, सुभाष अमोलिक, भाऊसाहेब कुताळ, विष्णुपंत डावरे, बाळासाहेब दाणी, प्रफुल्ल डावरे, एकनाथ नागले, पुरुषोत्तम भराटे, सुधाकर खंडागळे, प्रल्हाद अमोलिक, गोरक्षनाथ कुऱ्हे, जनार्धन ओहोळ, मधुकर अनाप, विलास कुऱ्हे, रमेश काळे, सचिन वाघ,अन्वर सय्यद,दिलीप अमोलिक, प्रभात कुऱ्हे, मोहसीन सय्यद, महेश कुऱ्हे, भैय्या शेख, जाकीर शेख, विशाल आंबेकर, भाऊसाहेब तेलोरे, श्रीहरी बारहाते, गोपी दाणी, शफिक बागवान, अल्ताफ शेख, बाबुराव पवार, अजिज शेख, असिफ शेख, तस्वर बागवान, समीर जहागिरदार, जब्बार आतार, जब्बार सय्यद आदि उपस्थित होते.



***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी