शीतल टाईम्स //मोहंमद पैगंबराचे विचार आचरणात आणण्याची गरज -अरुण पा, नाईक

   


शीतल टाइम्स प्रतिनिधी

 मोहंमद पैगंबरांचे विचार आचरणात आणण्याची गरज -अरुण पा, नाईक

 बेलापुरात "जल्सा-ए-सिरतुन नबी" व "वृक्षारोपण" कार्यक्रम संपन्न

शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर :- ( प्रतिनिधी )-
मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे एक थोर समाज सुधारक होते यांनी समाजात असणाऱ्या अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच महिलावर होणारे अत्याचार यावर आळा घातला त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनी व्यक्त केले गौसे आजम सेवाभावी संस्था व जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे जलसा -ए-सिरतुन नबी तसेच वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला ,त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार लहुजी कानडे, जि.प.सदस्य शरद नवले, कृ.उ.बा.स.उपसभापती अभिषेक खंडागळे, अक्षय पा.नाईक, आदिंनी मनोगत व्यक्त करताना गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या व संस्थापक मुख्तार सय्यद व अध्यक्ष सुलतान शेख यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील समाज कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यात गुणवत्ता यादीत नावलौकिक मिळवणारी फातिमा अजहर सय्यद "हीचा सन्मान करण्यात आला.



त्यावेळी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच तबस्सुम बागवान, जामा मस्जिदचे ट्रस्टी जाफरभाई आतार पत्रकार देविदास देसाई असलम बिनसाद मुनिर बागवान अजीज शेख, मोहसिन सय्यद,शफीक बागवान, सरफ़राज़ सय्यद,रफीक शाह, मोहसिन शेख ,मुनीरभाई बागवान, शाहनवाज भाई , हाजी इस्माइल,जिना भाई, और अकबर सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्था चे संस्थापक मुख़्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव, राजू शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, व सर्व सदस्य हितचिंतक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनाब इमाम सय्यद यांनी केले सूत्रसंचलन अलविरा मुस्ताक आतार हीने केले तर मोहसीन सय्यद यांनी आभार मानले.




***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी