शीतल टाईम्स//बेलापुरात भराटे यांनी साकारली गड किल्ल्याची प्रतिकृती
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापुरात भराटे यांनी साकारली गड किल्ल्याची प्रतिकृती
बेलापुर (प्रतिनिधी)-गड किल्ल्याचे संरक्षण व्हावे तसेच सेल्फी काढता होणाऱ्या दुर्घटना टळाव्यात या करीता बेलापुर तालुका श्रीरामपुर येथील पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या घरात बसविलेल्या गणपती बाप्पा समोर छोट्याशा जागेत सुंदर असा गड किल्ल्याचा देखावा उभारला आहे . बेलापुरगाव हे गणेशोत्सव काळात जिवंत देखावे असणारे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख होती. हळूहळू तरुण पिढीचा कल बदलला तसे गणोशोत्सवाला वेगळे स्वरुप येवु लागले .परंतु आजही बेलापुरगावात सुंदर असे देखावे केले जातात येथील कलाकार पुरुषोत्तम भराटे यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने सलग पाच दिवस कष्ट घेवुन घरातच छोट्याशा कोपऱ्यात सुंदर अशी गड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असुन ती तयार करताना अतिशय बारकाईने तन मन व धनही ओतुन सुंदर अशी आरस सादर केली आहे, ही आरस तयार करताना सामाजिक संदेश देण्यासही ते विसरले नाही ही प्रतिकृती पाहील्यानंतर आपोआपच आपल्या तोंडून आपोआपच शब्द फुटतात "वा काय ही कल्पकता" ही आरस करण्यासाठी पुरुषोत्तम भराटे यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ जयाताई भराटे मुलगा शुभम व प्रतिक यांनी मोलाचे सहकार्य केले.
***************************************************
***************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
***************************************************
***************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा