शीतल टाईम्स //मोबाईलसह सराईत गुन्हेगारास अटक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई बेलापुरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लावला गुन्हेगारांचा छडा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

मोबाईलसह सराईत गुन्हेगारास अटक

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई

बेलापुरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लावला गुन्हेगारांचा छडा

शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी



शीतल टाइम्स प्रतिनिधी

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंकीत बेलापूर दुरक्षेत्र हद्दीत बेलापुर गावातील नागरिकांचे मोबाईल फोन चोरणारे आरोपी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलिसांनी मोठ्या शिताफिने मोबाईलसह जेरबंद केले. 
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंकीत बेलापूर दुरक्षेत्र हद्दीत बेलापुर गावातील फिर्यादी विकास कचरु सोनवणे यांचा i-phone कंपणीचा मोबाईल फोन, शाहबाज शकिल कुरेशी यांचा विवो कंपणीचा निळ्या रंगाचा ५-२० मोबाईल, रमजान वशीर पठाण यांचा विवो कंपणीचा निळ्या रंगाचा ४-३० मोबाईल, पंकज भाउसाहेब रंधे यांचा रेडमी कंपणीचा पांढऱ्या रंगाचा १०-PRIME मोबाईल (सर्व राहणार बेलापूर) यांचे एकुण ५ महागडे मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गुर.नं. ८८३/२०२४ भा.न्या.स. कलम ३०३/२) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बेलापुर दूरक्षेत्र येथील सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉं कोळपे, पोकॉं ज्ञानेश्वर वाघमोडे, पोकॉं संपत बडे, पोकॉं भारत तमनर, पोकॉं लोखंडे यांना बोलावून गेले मालाचा व आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना देवुन अभिलेखावरील आरोपीबाबत मार्गदर्शन केले.
नमुद गुन्ह्याचा बेलापुर हद्दीत असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचा बारकाईने अभ्यास करुन त्या आधारे तपास केला असता सदर चोरी ही सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख व त्याचेसोवत आणखी ईतर साथीदार यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेतला तसेच गुप्त बातमीदार सक्रिय करुन सदर चोरी ही शाहरुख उर्फ चपट्या व त्याचा साथीदार सोहेल यांनी केल्याचे आणि चोरीची मालमत्ता हि बाबर जब्बार पठाण यास विक्री केल्याबाबत खात्रीलायक माहीती मिळताच पोनि नितिन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोकॉं संपत बडे, पोकॉं ज्ञानेश्वर वाघमोडे, पोकॉं आंबादास आंधळे यांचे पथक तात्काळ रवाना करण्यात आले.
दि.१०/०९/२०२५४ रोजी रात्री २३/०० वा चे सुमारास नमुद पथकाने साध्या वेशात रेल्वेस्टेशन परीसरात सापळा रचून सदर ठिकाणी आरोपी शाहरुख व त्याचा साथीदार बाबर हे दिसल्याने त्यांना पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून जात असतांना त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफिने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यानी त्यांचे नाव १) शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वय-३५ वर्षे रा.डावखर रोड वार्ड नं ०६ श्रीरामपुर जि. अहमदनगर २) बाबर जब्बार पठाण वय-२५ वर्षे रा. वार्ड नं.०२ श्रीरापमूर असे सांगीतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये वर नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक i-phone कंपणीचा मोबाईल फोन व व्हिवो कंपणीचा ५-२० हे मोबाईल मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून अटक केली.
आरोपी शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख व आरोपी बाबर जब्बार पठाण यांचेवर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अभिलेखावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख याचेवर अभिलेखावरील गुन्हे पुढीलप्रमाणे - १९५/२०२४ भादवी कलम ४५७,३८०, गु.र.नं.३२१/२०२४ भादवी कलम ३७९, गु.र.नं.५९५/२०२४ भादवी कलम ३७९, गु.र.नं.११३२/२०२३ भादवी कलम ३७९, गु.र.नं. ७९४/२०२४ भा.न्या.स. कलम ३०३ (२).आरोपी नामे बाबर जब्बार पठाण याचेवर अभिलेखावरील गुन्हे पुढीलप्रमाणे - गु.र.नं.५५६/२०२२ भादवी कलम ४३९,३९९.४०२, गु.र.नं १५८/२०२२ भादवी कलम ३७९.३४, गु.र.नं २५/२०१९ भादवी कलम ३९२,३४, गु.र.नं ४३/२०२२ भादवी कलम ३७९,३४. सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पो.उप. निरीक्षक हापसे, पोहेकॉं बाळासाहेब कोळपे, पोकॉं संपत बडे, पोकॉं ज्ञानेश्वर वाघमोडे, पोकॉं भारत तमनर, पोकॉं लोखंडे, पोकॉं आंबादास आंधळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बेलापुर दुरक्षेत्रचे पोहेकॉं कोळपे हे करीत आहे.



***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी