'शीतल टाईम्स' - बेलापूरात इस्रोची स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा 'शीतल टाईम्स' प्रतिनिधी

बेलापूरात इस्रोची स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा

'शीतल टाईम्स' प्रतिनिधी    

शीतल टाइम्स प्रतिनिधी

‌बेलापूर:-भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान, बेलापूर यांच्या विशेष प्रयत्नाने राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०. ३० ते सायंकाळी ७. ०० वाजेपर्यंत आझाद मैदान बेलापूर बुद्रुक येथे इस्त्रो स्पेस ऑन व्हील हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप साळुंके, अँड. मयुर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके यांनी दिली.


या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना श्री साळुंके म्हणाले की, बेलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत घडामोडींची ओळख करून देण्यासाठी सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्रो(ISRO) बसद्वारे विविध उपक्रम सादर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला पंख देण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरचा विशेष कार्यक्रम हा पंचक्रोशीतील विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांच्या विशेष फायद्यासाठी आहे. इस्रो या देशपातळीवरील महत्वाच्या अंतराळ संस्थेची कार्य रचना, देश हिताचे उपक्रम समजून सांगण्यात येणार आहेत. तसेच इस्रो या अंतराळ संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधी बाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनविण्यासाठी तसेच त्यांच्या मनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी इस्त्रो ऑन व्हील्स या उपक्रमाला बेलापूर व परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी. सदरचा उपक्रम मोफत आणि सर्व वयोगटासाठी खुला आहे. तरी सदरचे उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप साळुंके, ॲड. मयुर साळुंके, ॲड.अजिंक्य साळुंके, पुरुषोत्तम साळुंके, प्रताप साळुंके, प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके, संजय साळुंके यांनी केले आहे.



*********************************
*********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*********************************
*********************************


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी