शीतल टाईम्स //बेलापूर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी अतिशय उत्साहात साजरी शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी


बेलापूर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी अतिशय उत्साहात साजरी

शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी


शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर ग्रामस्थ व समस्त तिळवण तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी कार्यक्रम यानिमित्ताने श्री संत शिरोमणी संताजी महाराज मंदिर बेलापूर येथे सकाळी ८.०० वाजता पुण्यतिथी निमित्ताने सत्यनारायण पुजा अणि महाअभिषेक पूजा श्री. व सौ. अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके आणि श्री. व सौ. गोकुळ रामेश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. 
यानंतर पारंपरिक पद्धतीने थाटामाटात, वाद्यांच्या सघोषात, अश्वरथामध्ये स्वार होऊन संत शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक पूर्ण गावामध्ये, झेंडा चौक तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथून चैतन्यपूर्ण वातावरणात काढण्यात आली. त्यावेळेस सर्व समाज बांधव, गावातील ग्रामस्थ, सर्वच जेष्ठ-श्रेष्ठ-युवा त्यावेळेस मिरवणुकी दरम्यान उपस्थित होते. संपूर्ण गावातील वातावरण अतिशय चैतन्यमयी झाले होते. "जय संताजी" च्या उद्घोषणाने गावातील संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झाले होते. सदरच्या मिरवणुकी दरम्यान सर्व समाज बांधव, युवा, ज्येष्ठ-श्रेष्ठ, समाज भगिनी यांचा असणारा सहभाग हा उल्लेखनीय होता. तद्नंतर ह.भ. प. मच्छिंद्र महाराज चोरमले महाराज (शास्त्री) संगमेश्वर संस्थान तिळापूर यांचे सुमधुर हरी कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर बेलापूर शहरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत महाआरती व तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
समस्त तिळवण तेली समाजाने अतिशय पारंपारिक पद्धतीने पुण्यतिथी साजरी करत असतानाच समाजाने एक अनोखा सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम देखील साजरा केला. कार्यक्रमाच्या वेळी श्री. व सौ. पुरुषोत्तमशेठ गंगाधरशास्त्री साळुंके यांच्यातर्फे १३५ समाजसुधारक, देशभक्त आणि क्रांतिकारक यांचे जीवन परिचयाचे पुस्तक देखील समाज बांधवांमध्ये वाटप करण्यात आले; जेणेकरून युवकांमध्ये,  समाजामध्ये राष्ट्रभक्ती, समाजसुधारक आणि क्रांतिकारक यांच्या प्रति पुढील पिढीला त्याची जाण असावी, म्हणून हा उपक्रम करण्यात आला. त्या पुस्तक वाटप कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी पुरेपूर प्रतिसाद देखील दिला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा २०२४ बेलापूर यांच्या सर्व कार्यकारिणीने उपस्थित ग्रामस्थांचे आणि समाज बांधवांचे मनापासून आभार देखील मानले.




*********************************
*********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*********************************
*********************************


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी