शीतल टाईम्स // बेलापूरगावची कायदा व सुव्यवस्था काटेकोर करणार - पो.कॉ.संपत बडे शीतल टाईम्स प्रतिनिधी

बेलापूरगावची कायदा व सुव्यवस्था काटेकोर करणार - पो.कॉ.संपत बडे

शीतल टाईम्स प्रतिनिधी 


शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूरः- बेलापूर पौलिस औट पोस्टच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  कठोर पावले उचलली जातील. अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकांबाबत सरकारच्या निर्देशाचे काटेकोर पालन करण्यात येवून याबाबत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे प्रतीपादन काँन्स्टेबल संपत बडे यांनी केले.


श्री.बडे यांना नुकताच उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बेलापूर पत्रकार संघाच्यावतीने संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व सचीव रणजीत श्रीगोड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना श्री.बडे बोलत होते.


याप्रसंगी काँस्टेबल भारत तमनर समवेत संघाचे खजीनदार सुनिल मुथा, सहसचिव विष्णुपंत डावरे, सुनिल नवले, सुहास शेलार, दिपक क्षत्रिय, दिलिप दायमा, आतिष देसर्डा, ऑडीटर संजय गोरे आदि उपस्थित होत.


प्रास्ताविक करताना श्री.सुनील मुथा यांनी श्री.बढे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्यावर समाजाकडून कौतुकाची थाप मिळाल्यास काम करणाऱ्यास अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. बेलापूर औट पोस्टच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता आपले काम निर्भयपणे करावे. चांगल्या कामाला पत्रकार संघाचा कायम पाठींबा राहिल असे आश्वासन श्री.मुथा यांनी दिले.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी