शीतल टाईम्स //- बेलापुरात मराठी शाळेसमोरील जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी पकडले शीतल टाईम्स प्रतिनिधी
बेलापुरात मराठी शाळेसमोरील जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी पकडले
शीतल टाईम्स प्रतिनिधी
बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर बुद्रुक येथील वडारवाडा परिसरात पोलिसांनी छापा टाकत ९ जुगाऱ्यांना पकडले आहे. बेलापूर बद्रुक येथील मराठी शाळेसमोर असलेल्या बडारवाडा येथील दादा भाई बागवान यांच्या घराच्या भिंतीच्या पाठीमागे अडोशाला तिरट नावाचा जुगार खेळताना किरण अनिल गायकवाड, किरण नारायण मुंडलिक, जगन्नाथ पुंजाहरी गाढे, कचरू मारूती मांजरे, सुभाष विठ्ठल गायकवाड, शरद अशोक गायकवाड, राजू मारूती गायकवाड, विलास मोहन बोरूडे, सर्व रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर, तसेच अफसर कादर अब्दूल खान, रा. रामगड, बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर यांना पोलिसांनी छापा टाकून दुपारी २.४५ च्या दरम्यान रंगेहाथ पकडले. या छाप्यात पोलिसांनी ४ हजार रूपयांची रोकड व पत्ते जप्त केले असून याप्रकरणी पोकॉ. पंकज सानप यांनी फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसात वरील ९ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. हापसे हे करीत आहेत.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************
On line jugari kon pakdnar
उत्तर द्याहटवा