शीतल टाइम्स प्रतिनिधी सेंट लुक्स कॉलेज ऑफ नर्सिंग, श्रीरामपूर मध्ये महिला मेळावा उत्साहात साजरा


शीतल टाइम्स प्रतिनिधी 

सेंट लुक्स कॉलेज ऑफ नर्सिंग, श्रीरामपूर मध्ये महिला मेळावा उत्साहात साजरा



श्रीरामपूर येथील सेंट लुक्स हॉस्पिटल मधील कॉलेज ऑफ नर्सिंग आणि समाजसेवा विभागातर्फे दिनांक १५ मार्चला महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून राजश्रीताई ससाणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

मदर तेरेसा या ममता प्रेम, त्याग आणि सेवा यांचा अनोखा संगम आहे. त्यांनी दीन दुबळ्या, गोरगरीब, दिव्यांग आणि अनाथांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून दिले. त्यांच्या कार्याचा वारसा सेंट लुक्स हॉस्पिटल च्या नन्स,सिस्टर्स, कर्मचारी समाजसेवक आणि विद्यार्थी यशस्वीरीत्या पुढे चालवत आहेत. महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, बचत गट, सांस्कृतिक आणि सामाजिक विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी राजश्रीताई ससाणे यांनी कविता सादर केली, त्यास महिलांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला.

महिला मेळाव्यात प्रथमतः दिपप्रज्वलन, महापुरुष आणि महिलांसाठी कार्य केलेल्या थोर महिलांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित प्रमुख आणि पदाधिकारी महिलांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर विविध बचत गट आणि मंडळाच्या महिलांनी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी सांस्कृतिक कार्यक्रम, संदेशपर नाटिका, नृत्य, भारुड, गिते सादर केले. प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महिलांना प्रिती भोजन देण्यात आले. सौ.तेरिजा सुधीर तेलोरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले

यावेळी कौशल्य विकास, रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शिका प्रिती जाधव, प्रिया बोर्डे, संत लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव, संत इन्सीयस चर्च, बीड चे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर सुनिल गायकवाड, सेंट लुक्स हॉस्पिटल च्या ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टर जेन्सीया मेरी, सेंट लुक्स नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल सिस्टर रिना, व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर सलोमी चाको, सेंट लुक्स हॉस्पिटल च्या कम्युनिटी सुपिरियर सिस्टर सरोज परमार, मेट्रेन सिस्टर ॲन्सी चाको, सिस्टर बेनिन्या, आशांकुर महिला प्रशिक्षण केंद्र, भोकर च्या संचालिका सिस्टर प्रिस्का, कनोसा कॉन्व्हेंट च्या सुपिरियर सिस्टर लुईजा, सिस्टर डायना, बेलापूर बुद्रुक च्या सरपंच स्वातीताई आमोलिक, उपसरपंच प्रियंकाताई कुऱ्हे, तबसुम बागवान, बेलापूर खुर्द च्या सरपंच प्रणाली भगत, कान्हेगाव च्या सरपंच सुरेखा देवराय, सदस्या चांदणी सोनवणे उपसरपंच उज्ज्वला खरात, लाडगाव च्या उपसरपंच विमल थोरे, सदस्या रोहिणी तांबे, विमल भोसले, निर्मला भोसले, ज्योती शिंदे, आशाबाई तेलोरे, संध्या तेलोरे,निर्मला आमोलिक यादींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी महिला, महिला मंडळाच्या पदाधिकारी, सेंट लुक्स हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेजचे डॉक्टर्स, सिस्टर्स, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिस्टर रिटा, सिस्टर जॅकलिन, विनाताई दुशिंग, डॉक्टर्स आणि सिस्टर्स, शिक्षकवृंद, कर्मचारी, समाजसेविका, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सौ.माधुरी शिनगारे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.तेरिजा सुधीर तेलोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सविता धायजे आणि हर्षदा फुलपगार यांनी केले.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी