शीतल टाईम्स // 📰 प्रवीण काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
शीतल टाइम्स प्रतिनिधी
📰 प्रवीण काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
शीतल टाईम्स प्रतिनिधी
📍 श्रीरामपूर – काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी आणि प्रभावी कार्यकर्ते प्रवीण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला नवे वळण दिले आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर त्यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते अविनाशदादा आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केली. श्रीरामपूर येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात प्रवीण काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
---
🌸 मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छांचा वर्षाव
या सत्कार समारंभात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रवीण काळे यांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये अविनाशदादा आदिक, अरुण पाटील नाईक, कपिल पवार, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, युवक अध्यक्ष संदीप चोरगे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका जन्वेजा, नगरसेवक मुक्तारभाई शहा, विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, ज्येष्ठ नेते विष्णुपंत खंडागळे, अॅड. मधुकरराव भोसले, कार्याध्यक्ष सैफ शेख यांचा समावेश होता.
---
👥 इतर मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती:
बाबासाहेब कोळसे, कार्लस साठे सर, दीपक निंबाळकर, राजेंद्र कोकणे, अशोक भोसले, सुरेश पवार, तोफिक शेख, अक्षय नाईक, श्रीकांत दळे, रईस जागीरदार, गोपाळ वायदेशकर, सचिन ब्राह्मणे, रुबीना पठाण, अजिंक्य उंडे, मधुकर ठोंबरे, विक्रम नाईक, सुमित मुथा, प्रशांत खंडागळे, नितीन गवारे, सुधाकर बोंबले, जमीर शेख, भैय्या शहा, गणेश ठाणगे, गुरुचरण भाटियानी, अमित जगताप, आदित्य आदिक, सोहेल शेख, रोनित घोरपडे, रंजन व्हावळ, जयेश मगर, सतीश शिरसाठ, गणेश कदम, रमेश कोतकर, किशोर कांबळे आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
---
🔍 कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
या निवडीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल आणि प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा