शीतल टाइम्स प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल रूपाली भुतडा-राठी यांचा बेलापूर ग्रामपंचायतीत सत्कार
शीतल टाइम्स प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल रूपाली भुतडा-राठी यांचा बेलापूर ग्रामपंचायतीत सत्कार
बेलापूर (प्रतिनिधी) – "भगवान हरिहर केशव गोविंद आणि इंद्र बिल्वेश्वर यांच्या आशीर्वादामुळेच तसेच माझ्या आई-वडिलांचे व बेलापूरकरांचे प्रेम आणि पाठिंबा लाभल्यामुळेच मला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे," असे प्रतिपादन बेलापूरची सुपुत्री रूपाली भुतडा-राठी यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथील पवित्र देवस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्त झालेल्या रूपाली भुतडा-राठी यांनी नुकतीच बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी शरद नवले म्हणाले की, "रूपाली भुतडा यांनी आपल्या कार्यातून बेलापूरचे नाव धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उंचावले आहे. आता येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांना मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याची संधी आहे, ज्यामुळे आपल्या गावाचे नाव संपूर्ण राज्यात झळकणार आहे."
यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी सरपंच स्वाती अमोलीक, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, उद्योजक अमित लुक्कंड यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी उपसरपंच मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, पत्रकार दिलीप दायमा, प्रशांत बिहानी, कैलास सोमाणी, आदेश मुथा, महेश कुर्हे, सचिन काळे, किशोर बंगाळ, राजेंद्र काळे, श्रीकांत राठी, दादासाहेब कुताळ, संजय राठी, सचिन देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा