शीतल टाईम्स // बेलापूरात गोमांस विक्रीचा पर्दाफाश – बजरंग दल आणि गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांच्या मदतीने कारवाई शीतल टाईम्स | बेलापूर (प्रतिनिधी)


शीतल टाइम्स प्रतिनिधी



📰 बेलापूरात गोमांस विक्रीचा पर्दाफाश – बजरंग दल आणि गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांच्या मदतीने कारवाई
शीतल टाईम्स | बेलापूर (प्रतिनिधी)

बेलापूर येथील बाजार वेसजवळ असलेल्या उर्दू शाळेच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत असल्याची माहिती बजरंग दल व गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना सोबत घेऊन धाड टाकत ही कारवाई उघडकीस आणली.

या छाप्यात शकील आयुब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) हा पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांचे मांस विक्री करताना आढळून आला. त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या युसुफ अन्वर शेख यांच्या मालकीच्या बेकरीतही गोवंश मांस आढळून आले. यावेळी पोलिसांनी एकूण ५० किलो संशयित गोमांस जप्त केले असून, त्याचा तपास करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

ही कारवाई विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली. कार्यकर्ते ऋषिकेश बारहाते, अतुल थोरात (उक्कलगाव), संकेत खर्डे, दिनेश राकेचा (कोल्हार), रावसाहेब आमोलिक (वळदगाव), आणि रोहित शिंदे (बेलापूर) यांनी ही माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई केली.

बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

या प्रकरणात गोरक्षक दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख ऋषिकेश भागवत, अमोल टाकसाळ, कार्तिक जाधव, बंटी जाधव, ओम अनावडे या कार्यकर्त्यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले.

बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने स्थानिक प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, बेलापूर व परिसरातील इतर ठिकाणीही अशीच गोमांस विक्री होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

🔍 पुढील तपास पोलीस आणि पशुवैद्यकीय विभाग करत असून, आरोपींवर कठोर कारवाईची शक्यता आहे.


🟠 शीतल टाईम्स अपडेट्ससाठी वाचत राहा | अहिल्यानगरच्या बातम्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत!
📲 अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत पेजवर भेट द्या: [SheetalTimes.com]




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी