शीतल टाइम्स प्रतिनिधी 🔸 सरला बेट ते पंढरपूर पायी वारी : बेलापूरात दिंडीचे जल्लोषात स्वागत
शीतल टाइम्स प्रतिनिधी
🔸 सरला बेटे ते पंढरपूर पायवारी : बेलापूरात दिंडीचे जल्लोषात स्वागत
पंढरपूर (प्रतिनिधी) – पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरला बेट येथून निघालेल्या पायी दिंडीचे बेलापूरमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिनांक २२ जून ही दिंडी बेलापूरात आली. सरला बेटेचे महंत रामगिरी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे.
बेलापूरमध्ये दिंडीचे सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे आगमन झाले. या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली. नंतर बेलापूर व ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने स्वागत करण्यात येवून खिचडी महाप्रसाद चे वाटप करण्यात आले.
या स्वागत सोहळ्यात सरपंच सौ. मीनाताई साळवी, बाजाराचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, बेलापूर तंटामुक्त गाव समिती चे माजी अध्यक्ष प्रकाशराव कुऱ्हे, रेवणनाथ नवले, सुभाष राशीनकर, राजेंद्र टेकाडे, जनार्दन ओहळ, कलेश सातभाई, साहेबराव वाबळे, सचिन नगरकर, राजेंद्र राशीनकर मान्यवर उपस्थित होते.
या सेवाकार्यात बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर नवले, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, चंद्रकांत पाटील नाईक , भास्कर बंगाळ , जालिंदर कुऱ्हे, सुवालाल लुंंक्कड, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, गोपी दाणी, अशोक महाराज, विशाल आंबेकर, दिलीप दायमा, अरविंद साळवी, राजेंद्र काळे, महेश कुऱ्हे, जालिंदर गाढे यांच्यासह अनेक भाविक सहभागी होते.
"श्री विठ्ठलनामाचा गजर, पांडुरंगाच्या चरणी अर्पण भावना आणि महंत नारायणगिरी महाराजांच्या प्रेरणेतून" सुरू असलेली ही वारी अधिकाधिक भक्तीमय वातावरणात सरसावत आहे."
***********************************
***********************************
- संपूर्ण महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न संपर्क निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
आरएनआयएनओ.महमार/२००३/१३१८२
- बातम्या व जाहिराती
********- संपर्क - **********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. ९२२५३२७१७६
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. ८४८५८६७४२९
✒️ जिल्हा ठीक - शकील(बाबा)शेख
********* मो. ९२७३७२९८६७
*******************************
*******************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा