शीतल टाईम्स // बेलापूर पोलिस स्टेशनच्या आवारात उभ्या ट्रॉलीचे टायर पेटवण्याचा प्रयत्न! शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी


शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर पोलिस स्टेशनच्या आवारात उभ्या ट्रॉलीचे टायर पेटवण्याचा प्रयत्न!


बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर ग्रामपंचायतची ट्रॉली बेलापूर पोलीस स्टेशनसमोर उभी असताना, अज्ञात इसमाने या ट्रॉलीच्या  टायरजवळ आग लावून ती पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी निदर्शनास आली.

मॉर्निंग वॉकला निघालेले पत्रकार देविदास देसाई यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानी 'व्हाट्सअप'ला टाकलेले  ट्रॉलीच्या टायर जवळ  जळालेल्या राखेचे आणि टायरच्या आजूबाजूच्या भागाचे फोटो सध्या सोशल मीडियावरही फिरत आहेत. ट्रॉलीवर "यश ट्रॅक्टर्स बेलापूर" असे लिहिलेले असून, ही ट्रॉली बेलापूर ग्रामपंचायतीच्या कामासाठी वापरली जात असल्याची माहिती आहे. 

 आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पत्रकार देसाई यांनी सांगितले की  ट्रॉलीचे मोठे नुकसान टळले असले तरी, ही घटना ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. पोलीस व बेलापूर ग्रामपंचायत यांचेशी संपर्क साधून माहिती कळवली आहे. घटना पोलीस स्टेशनच्या आवारात घडली असताना आपण स्वतः पोलिसांना भेटून सदर घटनेचा पंचनामा करून आरोपी समोर आणण्यासाठी पाठपुरावा करणार अहोत. "शीतल टाईम्स" शी बोलताना पत्रकार देसाई पुढे म्हणाले की पोलीसांनी तपास करुन घटनेतील तथ्य आणि आरोपी समोर आणले पाहीजे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात इसमाची ओळख पटवण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी