शीतल टाईम्स // 📸 लोकराजा शाहू महाराज जयंतीनिमित्त श्रीरामपूरमध्ये अभिवादन कार्यक्रम
शीतल टाइम्स प्रतिनिधी
---
📸 लोकराजा शाहू महाराज जयंतीनिमित्त श्रीरामपूरमध्ये अभिवादन कार्यक्रम
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने श्रीरामपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकराजा शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर केला. भारतीय कर्मचारी संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “छत्रपती शाहू महाराज हे पहिलेच व्यक्तिमत्व होते ज्यांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाचा पाया रचला. बहुजन समाजासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू करून ते खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे ठरले.”
यावेळी बामसेफचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. के. चौदंते, माजी सरपंच पी. एस. निकम, लोकवेधचे संचालक अशोकराव जाधव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे तालुकाध्यक्ष सलीम शेख, बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, मुळा-प्रवराचे माजी संचालक अशोक बागुल, तसेच बापू वैराळ, सुधाकर बागुल, तुकाराम धनवडे, सी. एस. बनकर, भारत पगारे, शांताराम बोर्डे, प्रकाश सावंत, एल. एन. म्हस्के, फ्रान्सिस शेळके, भाऊसाहेब हिवराळे, दिनकर मोरे, भाऊसाहेब खरात, अंतोन भरपूरे, के. सी. दाभाडे, लक्ष्मण मोहन, कचरू साबळे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक समतेसाठी पुढे चालण्याचा निर्धार व्यक्त केला.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा