शीतल टाईम्स । - गुप्तधनाबाबत चौकशीचे उपोषण पोलीस निरिक्षकांच्या आश्वासनानंतर मागे शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

 




गुप्तधनाबाबत चौकशीचे उपोषण पोलीस निरिक्षकांच्या आश्वासनानंतर मागे

शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

     खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या मागणी करीता मनसेच्या वतीने  सुरु केलेले उपोषण भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या मध्यस्थीने व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या अश्वासना नंतर मागे घेण्यात आले.

    बेलापुर येथे खटोड यांच्या निवासस्थानी खोदकाम करताना गुप्तधन सापडले होते त्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची चर्चा होती. खोदकाम करणाऱ्या मजुरांनी देखील विविध वृत्तवाहीनीला मुलाखत देताना सांगीतले होते. त्यानंतर केवळ चांदीच शासनाच्या हवाली करण्यात आली. मजुरांनाही लालच देण्यात आली. त्यामुळे या सर्व घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करुन सर्व गुप्तधन शासनाने ताब्यात घ्यावे. तो सर्व निधी बेलापूरच्या विकासाकरीता वापरण्यात यावा.

    वरील मागणी करीता मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोबडे उपाध्यक्षसुरेश जगताप डाँक्टर संजय नवथर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर येळे करण कापसे हे उपोषणास बसले होते. काल रात्री १० वाजता भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या उपस्थितीत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपले म्हणणे वरीष्ठांना कळवू ,आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देवून आपण उपोषण सोडत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केले.

 




******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव