शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी पोलीस असल्याचे भासवून झडती घेण्याच्या बहाण्याने एक तोळ्याची अंगठी केली लंपास
शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी
पोलीस असल्याचे भासवून झडती घेण्याच्या बहाण्याने एक तोळ्याची अंगठी केली लंपास
बेलापुर (प्रतिनिधी )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत. तुमची झडती घ्यावयाची आहे. असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत चोरटे पसार झाले होते.
बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कॕमेरे लावलेले असतानाही कॕमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
******************************************************
******************************************************




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा