शीतलटाईम्स - हिंदुच्या देव-देवता, सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळ - बाबा शिंदे शीतलटाईम्स । श्रीरामपुर (प्रतिनिधी)
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
देव-देवता, सण उत्सवांवर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळ - बाबा शिंदे
शीतलटाईम्स । श्रीरामपुर (प्रतिनिधी)
कोरोनाचा धाक दाखवून अघाडी सरकारने हिंदुच्या देव-देवता बरोबरच सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचे महापाप केले असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह श्रीरामपुर येथे संपन्न झाला या स्पर्धेत घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रज्ञा तुंगर हीने मिळविले पल्लवी शेडगे हीने दुसरा क्रमांक मिळविला तर शीतल पाटील हीस तिसरा क्रमांक मिळाला
या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन आपली एकजुट दाखविणे गरजेचे आहे महीलांना कुणी त्रास देत असल्यास मनसे पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावि त्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल या पुढेही असेच विविध धार्मीक उपक्रम राबविण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला मनसेचे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर तुषर बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, तुषार बोबडे जिल्हा सचिव सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष डॉ, संजय नवथर विधानसभा अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव ईश्वर जगताप, शहर सरचिटणीस रोहित जौंजाळ, शहर चिटणीस अमोल साबणे, शहर उपाध्यक्ष मनोज जाधव, राजू शिंदे, बाबासाहेब भालेराव, संदीप विशंभर, तालुका संघटक मनविसे अतुल तारडे , कामगार सेना उप चिटणीस नंदू गंगावणे, विभाग अध्यक्ष,मारुती शिंदे, सागर त्रिभुवन, सचिन धोत्रे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश शिंदे, सद्दाम शेख, नितीन खरे, बाप्पू लबडे,आदिंनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिरसाट यांनी केले व निलेश सोनवणे यांनी आभार मानले.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
******************************************************
******************************************************



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा