शीतलटाईम्स - यंदाच्या सन २०२१/२२ च्या गळीत हंगामासाठी'अशोक' देणार प्रतिटन रु.२४०० ऊस दरः कहांडळ शीतलटाईम्स । अशोकनगर (प्रतिनिधी)


यंदाच्या सन २०२१/२२ च्या गळीत हंगामासाठी'अशोक' देणार प्रतिटन रु.२४०० ऊस दरः कहांडळ

शीतलटाईम्स । अशोकनगर (प्रतिनिधी)

अशोक सहकारी साखर कारखान्याना व्यवस्थापनाने यंदाच्या सन २०२१-२२ च्या गळित हंगामात गळितास येणाऱ्या ऊसासाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिटन रु.२ हजार ४०० प्रमाणे भाव देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना श्री.कहांडळ यांनी सांगीतले की, अशोक कारखाना यंदाच्या गळित हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसासाठी योग्य दर देईल, अशी भुमिका कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी गळित हंगाम शुभारंभप्रसंगी जाहिर केली होती. या पार्श्वभुमीवर व्यवस्थापनाने सकारात्मक भुमिका घेत यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन रु.२ हजार ४०० असा भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री.कहांडळ यांनी दिली.


****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव