शीतलटाईम्स ।- झेंडीगेटला गोमांसची सर्रास विक्री ; पोलीसांच्या कारवाईत गोमांसासह एकास अटक ! शीतलटाईम्स । अहमदनगर |प्रतिनिधी|

गोमांसची सर्रास विक्री ; पोलीसांच्या कारवाईत गोमांसासह एकास अटक!

शीतलटाईम्स । अहमदनगर |प्रतिनिधी

नगर शहरातील झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सलग सुरू असलेल्या कारवाईतून समोर आले आहे. शनिवारी कत्तलीसाठी जाणारा गोवंशीय जनावरांचा टेम्पो पोलिसांनी पकडला होता. रविवारी नऊ हजार रूपये किंमतीचे 55 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले.

झेंडीगेट येथे मिरा हॉटेल चौकात गोवंशीय जनावरांचे मांस विक्री चालू असल्याची खबर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, बापुसाहेब गोरे, सागर पालवे, ए. पी. इनामदार यांना कारवाई करण्याच्या सूचाना दिल्या.

इंगळे यांच्या पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास छापा टाकला असता दुकानात जाकीर खलील कुरेशी (वय 31 रा. झेंडीगेट) हा गोमांस विक्री करताना मिळून आला. पोलिसांनी 55 किलो गोमांस, एक लोखंडी सत्तुर असा नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुरेशी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रोहकले यांनी फिर्याद दिली आहे.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव