शीतल टाईम्स //संशयास्पद तांब्याच्या तारा तडजोड प्रकरणी एपीआय आव्हाड यांची चौकशी सुरू शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

संशयास्पद तांब्याच्या तारा तडजोड प्रकरणी एपीआय आव्हाड यांची चौकशी सुरू

शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथून संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक व टेम्पो मोठी आर्थिक तडजोड करुन सोडून दिल्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड व त्यांचे रायटर ज्ञानेश्वर वाघमोडे यांचेविरुध्द पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने पोलिस उपाधिक्षक बसवराज शिवपुजे यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती तक्रारदार भा.ज.प.चे नेते सुनिल मुथा यांनी दिली.                                            याबाबतचा सविस्तर तपशील असा की, शनिवार ता.१३ जुलै रोजी राञी संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक  व टेम्पोबाबतची खबर ए.पी.आय.सुरेश आव्हाड यांना मिळाली.सदरची खबर मिळताच श्री.आव्हाड व त्यांचे रायटर श्री.वाघमोडे यांनी बेलापूर येथिल नगर बायपासला राञी सदरची वाहने पकडून बेलापूर पोलिस चौकीत आणली.


यानंतर श्रीरामपूर येथील वार्ड नं.२ मधील काही व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी श्री.आव्हाड यांच्याशी आर्थिक तडजोड केली. त्यानंतर दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असुन सदर सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी चा अर्ज विहित वेळेत देऊनही पोलिसांकडून आज पावेतो फुटेज आपणास मिळालेले नसल्याचे ही तक्रारदार मुथा यांनी म्हटले आहे सदर तडजोडीचा प्रकार  गंभीर व पोलिस यंञणेला काळीमा फासणारा असल्याने आपण याबाबत  पोलिस महासंचालक यांचेसह सर्व वरिष्ठ पोलिस आधिका-यांकडे लेखी तक्रार केली होती.त्याची गांभिर्याने दखल घेवून पोलिस उपाधिक्षक श्री.शिवपुजे यांनी आज (ता.१३)रोजी याप्रकरणी चौकशी ठेवली असून चौकशीकामी उपस्थित राहणेबाबत आपणास लेखी कळविल्याचे श्री.मुथा यांनी सांगीतले. बहुचर्चित अशा या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव