बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू प्रतिकात्मक चित्र शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील कमलबाई आनंदा रणदिवे (वय अंदाजे ५५) या महिलेचा आज दुपारी रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील डोलाच्या प्रकरणात पैसे मिळत नसल्याने त्या वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारत होत्या. आजही त्या तहसील कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या मालधक्का परिसरातून रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांच्या साडीचा पदर रुळाला अडकला. तेवढ्यात रेल्वे येत असल्याने सोबत असलेल्या दोन महिलांनी रुळ पार केला, मात्र कमलबाई रणदिवे यांच्या साडीचा पदर गुंतल्याने त्यांना रुळ ओलांडता आला नाही आणि त्या दुर्दैवाने रेल्वेखाली सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तहसील कार्यालयातील डोलाच्या प्रकरणातील विलंबामुळे त्या मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. ******************************** ***************************...
शीतल टाइम्स प्रतिनिधी तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार श्रीरामपूर (प्रतिनिधी) स्वस्त धान्य दुकानांच्या ई-पॉज मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मराठीत नावे फीडिंग केलेल्या रेशनकार्ड धारकांचे बिल तयार होत नसल्याची समस्या उद्भवली आहे. परिणामी हजारो गोरगरीब कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील धान्य वाटपापासून वंचित राहण्याची वेळ आली असून नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माहितीनुसार, इंग्रजी डाटा फीडिंग असलेल्या कार्डांचे बिल सहज निघत असल्याने अशा कार्डधारकांना धान्य मिळत आहे. मात्र मराठी भाषेत नावे नोंदवलेले लाभधारकांचे बिल मशिनवरून निघत नसल्याने दुकानदार धान्य वाटप करू शकत नाहीत. यामुळे दुकानदार आणि लाभधारकांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली असून, “मागील महिन्यात धान्य मिळाले, मग यावेळी का मिळत नाही?” असा प्रश्न लाभधारक विचारत आहेत. या समस्येचा परिणाम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये ओयासिस कंपनीची ई-पॉज मशीन्स कार्यरत आहेत, त्याच ठिकाणी होत असल्याचे समजते. याबाबत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप...
शीतल टाइम्स प्रतिनिधी गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव बेलापूर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गोवंशीय जनावरांची वाहतूक केली, या संशयावरून काही गोरक्षकांनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उक्कलगाव येथील धनवाट रोड परिसरात २५ ते ३० जणांचा जमाव जमा झाला होता. या जमावाने गावातीलच एका शेतकरी तरुणाला थांबवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काही काळ गावात मोठी गर्दी जमली होती. मारहाणीनंतर गावात तणाव निर्माण झाला. गावात अफवा पसरल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मोठा जमाव जमला. मारहाण करणारे तरुण मात्र रात्रीच पसार झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी लागू झाल्यानंतर गोरक्षकांच्या नावाखाली अनेक वेळा अशा प्रकारच्या मारहाणीच्या व लुटमारीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास य...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा