शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले
शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील पाथरे येथून चोरीस गेलेली मोटरसायकल बेलापूर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीसह पकडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलापूर दुरुक्षेत्र इनचार्ज सपोनी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक इसम चोरी केलेली मोटरसायकल ही बेलापूर हद्दीत घेऊन येत आहे. त्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी बेलापूर क्षेत्र येथे असलेले पोलीस कॉन्स्टेबल बडे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांना बातमीतील हकीगत सांगून नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या मोटर सायकलची चौकशी करून त्यास ताब्यात घेण्याचा आदेश दिला. नमूद इसमास बेलापूर ते पडेगाव रोडवर थांबून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राज अनिल लोंढे वय 19 वर्षे, राहणार भेर्डापूर, तालुका श्रीरामपूर असे सांगीतले. त्याच्याकडे असलेली बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकलसह त्यास ताब्यात घेऊन बेलापूर दूरक्षेत्र येथे आणले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही पाथरे गाव येथून चोरी करून आणली असल्याची कबुली दिली. सदर प्रकरणाबाबत राहुरी पो.स्टे. येथे चौकशी केली असता राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 1057/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 ब प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासकामी त्यास व त्याचे कडील मोटरसायकल राहुरी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोसई सुधीर हापसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
***************************************************
***************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
***************************************************
***************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा