शीतल टाईम्स //अधिस्वीकृती पत्रिका ही पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी -किरण मोघे सीएसआरडीत पत्रकारांची जिल्हास्तरीय कार्यशाळा शीतल टाईम्स अहिल्यानगर प्रतिनिधी

अधिस्वीकृती पत्रिका ही पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी -किरण मोघे

सीएसआरडीत पत्रकारांची जिल्हास्तरीय कार्यशाळा 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

पत्रकारांना लेखनीमुळे सन्मान मिळतो. पत्रकारांना सकस पत्रकारिता करता यावी यासाठी शासन पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देते, असे प्रतिपादन शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी केले.
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय आणि सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सीएसआरडी संस्थेच्या सभागृहात विकास पत्रकारिता व पत्रकारांसाठीच्या विविध शासकीय योजना या विषयावर कार्यशाळा झाली. ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, सीएसआरडीचे प्रा. विजय संसारे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार, मुक्त पत्रकार, विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. मोघे म्हणाले, पत्रकारांसाठी पत्रकार सन्मान निधी योजना आहे. तसेच शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना आजारपणात मदत केली जाते. विकासात्मक पत्रकारितेसाठी शासनाचे विविध पुरस्कार आहेत. केंद्र सरकारचीही पत्रकारांना मदत करणारी योजना आहे. याबाबत पत्रकारांनी सतर्क राहून योजनांचा फायदा घेणे आवश्‍यक आहे. पत्रकारांच्या एका बातमीने समाजात मोठे परिवर्तन घडते. त्यामुळे विकास पत्रकारिता आवश्‍यक आहे.
लंके म्हणाले, अधिस्वीकृती व इतर योजनांची माहिती सर्व पत्रकारांना मिळावी यासाठी समिती जिल्हानिहाय कार्यशाळा घेत आहे. पत्रकारितेचा दर्जा उंचावणे व पत्रकारांच्या पाठिशी मदत उभी करणे हा समितीचा हेतू आहे. ढमाले म्हणाले, अधिस्वीकृती प्राप्त होण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य आहे. कुलथे म्हणाले, अधिस्वीकृती समिती ही पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी आहे. विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अनेक पत्रकारांना योजनाच माहित नसतात. त्यामुळे योजना पत्रकारांपर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.  प्रा. विजय संसारे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.



*********************************
*********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*********************************
*********************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव