शीतल टाईम्स //शीतल टाइम्स प्रतिनिधी समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने हिवाळी क्रिडा महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने हिवाळी क्रिडा महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर: - (प्रतिनिधी) येथे समता स्पोर्ट्स क्लब, बेलापूर यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे हिवाळी क्रिडा महोत्सवानिमित्त याही वर्षी भव्य सायकल व रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी संपूर्ण जिल्ह्यातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये यहभाग नोदवत असतात. या वर्षीही इच्छुक स्पर्धकांनी सदर स्पर्धांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक करत आहेत.
बुधवार दि. २५/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सायकल स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम बक्षिस: सायकल, दिपक फ्रांसिस केदारी यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: ३१००, श्रीमती निर्मला शरद जोगदंड यांचे तर्फे (स्वर्गीय शरद नानाजी जोगदंड यांच्या स्मरणार्थ), तृतीय बक्षिस : २१००, शाहनवाज सय्यद, सहारा ग्रुप यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ७०१ गंगाधर पवार श्वेता मेडिकल यांचे तर्फे देण्यात आले आहे.
तसेच गुरुवार दि. २६/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता मुलांसाठी खुल्या रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस: ४१००/- विक्रम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: ३१००/- सौ शिरीन जावेद शेख माजी उपसरपंच बेलापूर व सरफराज (भैयाभाई) शेख, खा.निलेश लंके प्रतिष्ठान, श्रीरामपुर यांचे तर्फे, तृतीय बक्षिस: २१००/- अल्ताफ इब्राहिम शेख जिल्हा सचिव भीमशक्ती संघटना यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ११००/- महिंद्र उर्फ पप्पू कपूर ( पी के बिअर शॉपी यांचे तर्फे तर उत्तेजनार्थ : ७०१/- अय्याज सय्यद यांचे तर्फे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या स्पर्धेनंतर १० वाजता मुलींसाठी रनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरच्या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. प्रवेश फी नाममात्र २० रु. आहे. स्पर्धेचे ठिकाण झेंडा चौक, बेलापूर बु.II असून इच्छूकांनी नाव नोंदणीसाठी बंटी शेलार मो. ९९४७९०४७२२, निशिकांत शेलार मो. ८७६६६९१७९७, अक्षय शेलार मो.९५९५५५९२१९, अजय शेलार मो. ९५०३५४७२७१ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समता स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संजय शेलार, उपाध्यक्ष प्रदीप(बंन्टी) शेलार, खजिनदार निलेश शेलार, सह खजिनदार विशाल शेलार कार्याध्यक्ष संकेत शेलार, रामा उमाप, सुनील शेलार, गौरव शेलार, ललित शेलार, ऋतिक शेलार, मार्गदर्शक रमेश शेलार, विजय शेलार, सुहास शेलार, सुभाष सयाजी शेलार, बाबासाहेब शेलार आदिंनी केले आहे.
*********************************
*********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*********************************
*********************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा